पश्चिम महाराष्ट्र

मताची भीक मागून मिळवले मंत्रीपद, आमदार अमोल मिटकरी यांची टिका

इंदापूर – राज्यात सीमावाद, शेतकऱ्यांबाबत अनास्था, तरुणांमधील नैराश्य या ज्वलंत प्रश्नांना बगल देण्यासाठी भाजप नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्य केले जात आहे.. महापुरुषांबाबत आपणांस वक्तव्य करणाऱ्यांविरुद्ध आता रस्त्यावरची लढाई लढण्यास तरुणांनी सरसवले पाहिजे असे म्हणत महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी कायदा करण्याची मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली..इंदापूर येथील शरद कृषी महोत्सव निमित्त आयोजित युवा संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.

महापुरुषांनी शाळा उभारण्यासाठी भीक मागितली असे वक्तव्य भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यांनी थातूरमातूर शब्दात माफी मागितली असली तरी, चंद्रकांत पाटील यांनी मताची भीक मागून मंत्रीपद मिळवले… असं म्हटलं तर त्यात काय चुकलं.. असा टोलाही मिटकरी यांनी लगावला.

लव जिहाद कायद्याचे स्वागतच…

लव जिहाद चा कायदा होत असेल तर त्याचे स्वागतच आहे मात्र, लव जिहादचा कायदा करत असताना मुस्लिमांना टारगेट करणे हे जर भाजपचे षडयंत्र असेल तर ते हाणून पाडले पाहिजे.. लव जिहाद, हिंदुत्व, किंवा मुसलमान हे तरुणांसमोरचे प्रश्न नसून रोजगार उपलब्ध करून द्या. आज कोट्यावधीचे रोजगार गुजरातला नेले आणि गुजरात जिंकलं… त्यामुळे जंग जिंकल्याचे भाजपला वाटते.. मात्र याचे परिणाम २०२४ ला त्यांना भोगावे लागतील. सर्वसमावेशक व कोणत्याही धर्माचा अपमान करणारा नसेल तर लव जिहाद कायद्याचे स्वागतच करू..

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment