कोंकण महाराष्ट्र

आमदार राजन साळवी यांची अँटीकरप्शनने केली साडेचार तास चौकशी

रायगड – कोकणात रत्नागिरी जिल्हयातील उद्धव ठाकरे गटाचे राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांना अँटिकरप्शन विभागाच्या रडावर आहेत. रायगड अलिबाग येथे अँटिकरप्शनच्या कार्यालयात त्यांची आज तब्बल साडेचार तास चौकशी करण्यात आली आहे. चौकशीसाठी शक्तीप्रदर्शन करत ते रायगड जिल्हयात अलिबाग येथे दाखल झाले होते.

लाचलुचपत विभागाला मी राजकीय प्रवासादरम्यान संपत्ती जमवून ठेवली असल्याचे वाटत आहे. लाचलुचपत विभागाने सहा फॉर्म माहिती भरण्यासाठी दिले आहेत. येत्या २० जानेवारीपर्यंत हि माहिती सादर करावी लागणार आहे. न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याने या चौकशीमध्ये वादग्रस्त काहीच आढळणार नसून तक्रार देणाऱ्यांचा भ्रमनिरास होणार आहे. असे आमदार राजन साळवी यांनी माध्यमांसमोर आपले मत मांडले .

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे  रत्नागिरी जिल्हयातील राजापूरचे आमदार राजन साळवी बुधवार १४ डिसेंबर रोजी साडे अकरा वाजता अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे आमदार राजन साळवी यांच्या समवेत उपस्थित असलेल्या शेकडो शिवसैनिकांनी अँटिकरप्शन कार्यालयाच्या बाहेर जमून घोषणाबाजी केली. साडेचार तास अधिकारी वर्गाने आमदार राजन साळवी यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. यामध्ये राजकीय प्रवास , कौटुंबिक व्यवसाय आणि वाढलेल्या संपत्तीवर लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष्य केले होते. 

मी लाचलुचपत विभागाच्या चौकशीला समोर गेलो. अधिकाऱ्यांनी मला माझी पत्नी , मुले , माझे दोन्ही भाऊ , त्यांचे कुटुंबीय आणि माझी स्वतःची चौकशी करून आमच्या व्यवसायाबाबत विचारणा केली. विचारलेल्या प्रश्नांची असणारी माहिती लाचलुचपत विभागाकडे सुपूर्द केली आहे. जी माहिती आता देता आली नाही, ती माहिती मला लाचलुचपत विभागाला द्यायची आहे. लाचलुचपत विभागाने मला सहा फॉर्म दिले आहेत. ते सर्व फॉर्म वकिलांच्या मार्फत भरून देण्यात येणार आहेत. मी खरेदी केलेल्या संपत्तीची माहिती लाचलुचपत विभागाला हवी आहे. ती सविस्तर माहिती २० जानेवारी पर्यंत देण्याचे मी त्यांना कबुल केले आहे. न्याय व्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. मला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आणि माहिती मी अधिकाऱ्यांना दिली आहे. अशी माहिती आमदार राजन साळवी यांनी दिली.

मी राजकीय दृष्ट्या कसा पुढे गेलो. नगरसेवक , नगराध्यक्ष , आमदार या राजकीय प्रवासात माझी संपत्ती वाढत गेली. असे लाचलुचपत विभागाला वाटत आहे. मला नोटीस आल्याबाबत मी लाचलुचपत विभागाला विचारले असता त्यांनी तक्रार कोणी दिली याबाबत सांगण्यास लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला. आम्ही माहिती काढली त्यात तक्रार करणारा खेड लोटे येथील असल्याचे समजले आहे. आम्ही त्याचा शोध घेणार आहोत. नागरिक म्हणून मी तक्रार केली तर कारवाई करण्याबाबतचे आश्वासन लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी मला दिले आहे. असे आमदार राजन साळवी यांनी सांगितले.

शिवसेना ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांची सोमवारी अलिबाग येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागमार्फत चौकशी ५ डिसेंबर रोजी केली जाणार होती. मात्र राजन साळवी चौकशीला आलेच नसल्याने ही चौकशी झाली नाही. त्यांनी चौकशीला येण्याबाबत पुढील तारीख मागीतली हाेती. त्यामुळे ते हजर राहीले  नव्हते. बुधवारी १४ डिसेंबरला आमदार राजन साळवी हजर राहिले असता लाचलुचपत विभाग अलिबाग येथील अधिकाऱ्यांनी त्यांची तब्बल साडेचार तास कसून चौकशी केली.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment