कोंकण महाराष्ट्र

पालघरमध्ये ७०० हून अधिक कर्मचारी संपावर

पालघर – महावितरण कंपनीच्या खासगीकरणाच्या विरोधात राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी 3 दिवसांचा संप पुकारला आहे. पालघर जिल्ह्यातील जवळपास ७०० हून अधिक महावितरणचे कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. पालघर येथील महावितरणच्या कार्यालयाबाहेर जिल्ह्यातील संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत आंदोलन पुकारले आहे. महावितरण खाजगीकरणा विरोधात, केंद्र व राज्य सरकार, अदानी समुहाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली.

महावितरण, महानिर्मिती, महारेशण कंपनीतील खाजगीकरण धोरण बंद करा, महावितरणमध्ये आदानी कंपनीला समांतर वीज वितरणाचा परवाना देऊ नये, कंत्राटी आऊटसोर्सिंग व सुरक्षा रक्षक कामगारांना कायम करा, तिन्ही कंपन्यातील रिक्त जागा भरा, एम्प्लॉयमेंट पद्धतीचे कंत्राटीकरण बंद करा, महावितरण मधील २०१९ नंतरची उपकेंद्रे कंपनी मार्फत चालवा व उपकेंद्रामध्ये कायम कर्मचाऱ्यांची पदस्थापना करा, आदींसह विविध मागण्यांसाठी महावितरणच्या कंपचार्‍यांनी हा संप पुकारला आहे. येत्या ७२ तासात राज्य सरकारने या संपावर सकारात्मक भूमिका न घेतल्यास १८ जानेवारीपासून बेमुदत संपावर जाऊ असा इशारा या संपात सहभागी झालेल्या ३१ संघटनांच्या कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment