मुंबई

दिव्यातील भाजप पदाधिकारी आणि नागरिकांचे डम्पिंग बंद करण्यासाठी आंदोलन

दिवा – निवडणुका जवळ आल्या की दिवा डंपिंग बंद करण्याचा खोटं आश्वासन वारंवार देण्यात येतं आहे,मात्र डंपिंग बंद झालेच नाही. त्यामुळे दिवा भाजप शहराध्यक्ष रोहिदास मुंडे यांच्या नेतृत्वात आज दिव्यातील नागरिक आणि भाजप पदाधिकारी यांनी डम्पिंग बंद आंदोलन केले. यावेळी दिव्यातील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावरती उतरले होते. तर डम्पिंगला जाणाऱ्या सर्व गाड्या अडवण्यात आल्या होत्या. याबाबत भाजप पदाधिकारी रोहिदास मुंडे यांनी सांगितले कि निवडणुका जवळ आल्या की दिव्याला दिव्यातील कचराभुमी बंद करण्याचे खोटे आश्वासन देण्यात येते. ऑक्टोबर महिन्यात कचराभुमी बंद होणार होती. पण, डिसेंबर महिना संपत आला तरी कचराभुमी बंद झालेली नाही. नागरिकांच्या प्रश्नासाठी आम्ही लढत असून दिवा कचराभुमी बंदहोईपर्यंत आमचा लढा सुरु राहणार आहे. दरम्यान दिव्यातील डम्पिंग विरोधात आवाज उठवणारी मनसे का शांत आहे, असा आता उपस्थित केला जातो आहे.

दिव्यातील कचराभुमीच्या समस्यमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यांच्याकडून कचराभुमी बंद करण्याची मागणी होत आहे. दिवा परिसर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या भागातील आठ प्रभागातून शिवसेनेचे नगरसेवक निवडुण आले होते.आगामी निवडणुकीत कचराभुमीचा मुद्दा शिवसेनेसाठी अडचणीचा ठरण्याची शक्यता व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर पालिकेत सत्तेवर असताना शिवसेनेने प्रशासनाच्या मदतीने कचराभुमी बंद करण्यासाठी पाऊले उचलली. त्याचाच एक भाग म्हणून महापालिका क्षेत्राबाहेर म्हणजेच भंडार्ली येथे तात्पुरती कचराभूमी उभारण्यासाठी पालिकेने जागा भाड्याने घेतली आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी काही स्थानिकांनी सुरुवातीला विरोध केला होता. विद्यमान मुख्यमंत्री हे ठाणे जिल्ह्याचे पालकमत्री होते. त्यावेळेस त्यांनी घेतलेल्या बैठकीनंतर स्थानिकांचा विरोध मावळला होता. त्यानंतर पालिकेने याठिकाणी कचरा विल्हेवाट यंत्रणा उभारणीबरोबरच रस्ता, शेड तसेच इतर आवश्यक कामे पुर्ण केली होती.

शिवसेनेतील फुटीनंतर दिव्यातील सर्वच म्हणजेच आठही नगरसेवक बाळासाहेबांच्या शिवसेनेत दाखल झाले आहे. या नगरसेवकांना कचराभुमीच्या मुद्द्यावरून कोंडीत पकडण्याचे काम भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे. राज्यातील सत्ता बदलानंतर दोघांचाही विरोध मावळेल आणि दोघेजण युतीमध्ये पालिकेच्या निवडणुका लढतील, अशी शक्यता वर्तविली जात होती. परंतु भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आणि नागरिकांनी  सोमवारी दिवा कचराभुमीच्या मुद्द्यावरून आंदोलन करत बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची पुन्हा कोंडी करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. तसेच ठाणे महापालिका निवडणुकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत ठाणे शहरात युती झाली तरी दिव्यात आम्ही युती करणार नसून आम्ही स्वबळावरच लढणार आहोत.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment