पश्चिम महाराष्ट्र

खासदार धनंजय महाडिक यांनी कन्नडिगांना दिला हा इशारा

कोल्हापूर – कानडी संघटनांकडून मंगळवारी महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आल्यानंतर संतापाचा पुन्हा एकदा उद्रेक झाला आहे. भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी तुमचा रस्ताही कोल्हापुरातून जातो, हे लक्षात ठेवा, असा इशारा दिला. संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी ते दिल्लीत आहेत. यावेळी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली. 

धनंजय महाडिक म्हणाले, मी कोल्हापूरमध्ये स्थायिक असल्याने कर्नाटकची हद्द 10 किमीवर सुरु होते. गेल्या अनेक वर्षांपासून सीमावाद सुरु आहे. मात्र, महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक करण्याची घटना घडली त्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो. वाद न्यायालयात प्रलंबित असताना अशी रस्त्यावरची गुंडगिरी, दादागिरी तेथील कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना शोभत नाही. जशी तुम्ही महाराष्ट्रातील वाहनांना इजा करता ते बघता कर्नाटकला देशभरात महाराष्ट्रातून जाण्याशिवाय पर्याय नाही हे यापूर्वी त्यांनी पाहिलं आहे. त्यांच्या वाहनाना कोल्हापूर, सोलापुरातून जावं लागतं याची जाणीव त्यांना असली पाहिजे. त्यामुळे अशा प्रकाराची दर्पोक्ती करत असतील, तर महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही. यावर तोडगा निघायला पाहिजे. 

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment