कोल्हापूर-भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे इन्स्टाग्राम (instagram) अकाउंट हॅक झाले आहे. महाडिक यांच्याकडून त्यांचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. अकाउंट रिकव्हर करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. यापूर्वी ही महाडिक यांचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाले होते . आता पुन्हा हा प्रकार घडला आहे.
धनंजय महाडिक यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील बायो बदलण्यात आला आहे. त्यावर Dhananjay Crypto Entrepreneur California असे दिसत आहे. महाडिक यांचे इन्स्टाग्रामवर ७६ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यांटे अकाउंट हॅक झाल्याने त्यावर त्यांची स्वतःची अशी काही माहिती दिसत नाही.