पश्चिम महाराष्ट्र

एमपीएससी परीक्षेत हमालाची मुलगी राज्यात प्रथम

कोल्हापूर राधानगरी – ऑनलाइन अभ्यास करून स्पर्धा परीक्षेत यश मिळवणं तसं कठीणचं. पण मनात जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेलतर आर्थिक परिस्थिती कशीही असली तरी यश खेचून आणता येतंं हे एका हमालाच्या मुलीने सिद्ध केलंय. जोगेवाडी येथील रेश्मा बाजीराव ऱ्हाटोळ ही एमपीएससी मधून राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षेत ओबीसी महिलांमधून राज्यात प्रथम आलीय. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होतंंय. पुरेशा सोयीसुविधा नसलेलं जोगेवाडी हे गाव डोंगराळ भागात वसलंय.

या गावातील भोगावती कारखान्यात हमाली कामगार म्हणून काम करणाऱ्या बाजीराव ऱ्हाटोळ यांच्या मुलीने त्यांच्या श्रमाचे चीज केलं. रेश्माने गावात प्राथमिक शिक्षण, तळाशी शाळेत माध्यमिक शिक्षण, बिद्री येथे बारावीपर्यंत शिक्षण, पुढे पॉलिटेक्निक कॉलेज, कोल्हापूर येथे डिप्लोमा केल्यानंतर डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. हे शिक्षण देताना वडिलांनी खूप कष्ट घेतलं. तिच्या यशाने बापाच्या कष्टाला यशाची झालर मिळाली आहे. हमाली करणाऱ्या बाजीराव ऱ्हाटोळ यांनी एका मुलाला आयटीआय, तर दुसऱ्या मुलाला बीएस्सी पर्यंत शिकवलं. तर रेश्माने अभियंता झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षेत ओबीसी महिलांमधून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment