पुणे – कोरोनाच्या नवीन व्हेरियंट ने जगभरात थैमान घातल आहे. चायना ने कोरोनाची परिस्थिती पाहता पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित केलं होतं. याचीच धास्ती संपूर्ण जगाने घेतली असून करुणाच्या रुग्ण संख्या मध्ये दिवसांदिवस वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्र राज्यात पुणे आणि मुंबई मध्ये कोरोना रुगणांची सर्वाधिक संख्या वाढ झालेली पाहिला मिळत आहे, मुंबई मध्ये दि. २६ रोजी ४९ रुग्ने सापडले असून पुण्यामध्ये ४६ रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्र सह भारतासाठी हा चिंताचा विषय झाला असून योग्य ती खबरदारी घेण्यासाठी प्रशासनाकडून आव्हान केले जात आहे.
कोरोना पुन्हा डोक वर काढत असताना, राज्यात सार्वजनिक ठिकाणी किंवा गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आणि सॅनिटायझर सोबत ठेवण्याचा आवाहन केलं जात आहे. मंदिर प्रशासन व्यवस्था ने देखील परिस्थितीचं गांभीर्य घेत मास्क वापरण्याचा आव्हान केला आहे. एअरपोर्टवर परराज्यातून येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी केली जात आहे. त्याचसोबत बूस्टर डोस ज्या नागरिकांचे घेण्यास राहिले आहे त्यांना देखील आपले डोस पूर्ण करण्याचं आव्हान केलं गेलं आहे.
चीनच्या उहाण शहरांमध्ये कोरोना वायरसचा जन्म झाला आणि तो सगळीकडे पसरला, सगळ्या जगाला कोरोना मुळे लॉकडाऊन परिस्थितीला समोर जावं लागलं होतं. मात्र आता त्याच शहरांमध्ये कोरोनाचा नवीन व्हेरियंट पुन्हा धुमाकूळ घालत आहे. महाराष्ट्रामध्ये पुणे आणि मुंबईमध्ये याचे सर्वाधिक रुग्ण सापडले असून देशासाठी मोठी चिंतेची बाब मानले जात आहे. करोनाची आकडेवारी पाहता खबरदारी घेतले असतानाही पुन्हा एकदा देशात मास्क सक्ती किंवा अन्य काही काळजी घेण्याची गरज असेल का ? ते येत्या आकडेवारीतन समोरील येईल.