कोंकण महाराष्ट्र

मुंडावळ्या बांधूनच नवरदेव मतदान केंद्राच्या मंडपात

रत्नागिरी – आजच आपल्या आयुष्याची लग्नगाठ बांधली जाणार आहे पण मतदानालाही तितकच महत्त्व देत एक युवक आज गुहागर तालुक्यात पाहायला मिळाला लग्नाच्या मुंडावळ्या बांधूनच मतदान केंद्राच्या मंडपात पोहोचला लोकशाही प्रक्रियेत पवित्र असलेला मतदानाचा हक्क बजावत आहे. मतदान करणे हा तरुण मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर दाखल झाला. आधी लोकशाहीप्रक्रियेत मतदानाचा हक्क मग आयुष्यभरासाठी जोडीदाराबरोबर लग्नगाठ असा निश्चय करुन मतदान करत एक मतदार जनजागृतीचा एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न या युवकाने केला आहे. जिल्हयात गुहागर तालुक्यातील चिखली येथील अभिलाष गोयथळे याने हा आदर्श घालून दिला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील २२२ ग्रामपंचायत पैकी ५९ ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्या असून उर्वरित १६३ ग्रामपंचायतीसाठी आज सकाळ पासून मतदानाला सुरुवात झाली आहे.त्यामध्ये सरपंच पदासाठी ४०६ उमेदवार तर सदस्यपदासाठी १२०६ उमेदवार रिंगणात आहेत. ५०७ मतदान केंद्रावर २ लाख १५ हजार ४५ मतदार आपला हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये १ लाख १२ हजार ४२५ महिला आणि १ लाख २ हजार ५२० पुरूष मतदार आहेत ६७ ग्रामपंचायतीमध्ये सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. आज होणाऱ्या निवडणूकित रिंगणात ४०६ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.

गुहागर तालुक्यातील चिखली येथील अभिलाष गोयथळे या युवकाचे आज लग्न आहे लग्नाची लगबग सुरू आहे. मात्र आपल्या गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक आहे त्यासाठी मतदान करणेही तितकेच महत्वाचे आहे. लग्नासोहळ्याआधी मतदानाला प्राधान्य दिले त्यामुळे अभिषेक गोयथळे अवघ्या जिल्हयात कौतुकाचा विषय ठरला आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment