महाराष्ट्र

हत्या प्रकरणातील दोषीचा भाजपात प्रवेश

अंबरनाथ – अंबरनाथमधील समीर गोसावी यांच्या हत्या प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या भालचंद्र भोईर यांनी भाजपात प्रवेश केला आहे. भोईर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन दिला आहे. असं असतानाही भाजपनं त्यांना प्रवेश दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

व्हीओ : अंबरनाथ मध्ये २००९ साली समीर गोसावी यांची व्यावसायिक वादातून हत्या झाली होती. या प्रकरणात भालचंद्र भोईर यांच्यासह त्यांच्या भावांना अटक करण्यात आली होती. सत्र न्यायालयाने त्यांना या हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. अनेक वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर भालचंद्र भोईर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत जामीन मिळवला होता. मागील दीड ते दोन वर्षांपासून भालचंद्र भोईर हे जामिनावर बाहेर असून महिन्यातून एकदा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ते हजेरी देण्यासाठी येतात. मात्र आता त्यांनी थेट भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत डोंबिवलीत हा प्रवेश करण्यात आला. भोईर यांच्यासह त्यांच्या पत्नी मनीषा भालचंद्र भोईर यांनीही भाजपात प्रवेश केला असून त्यांना जिल्हा उपाध्यक्ष पद देण्यात आलं आहे. हत्या प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या गुन्हेगाराला भाजपने थेट प्रवेश दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment