पश्चिम महाराष्ट्र

महिन्याभरानंतर उलघडले हत्येचं गूढ

ठाणे – ठाण्यातील भिवंडी परिसरातील कशेळी येथील टोलनाक्या जवळ ७ डिसेंबर रोजी माथाडी कामगार संघटनेच्या गणेश कोकाटे याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर ठाणे परिसरात एकच खळबळ उडाली होती. कारण ठाण्यात तीन महिन्यात झालेली हि चौथी गोळीबाराची घटना होती. या गोळीबारात कोकाटे हे गंभीर जखमी झाले होते आणि उपचारादरम्यान कोकाटे याचा मृत्यू झाला. या प्रकरणी ठाणे पोलीस आणि गुन्हे शाखा संगनमताने तपास करत होते. तब्बल १ महिन्यानंतर ठाणे गुन्हे शाखा घटक ५ च्या पोलिसांना या गोळीबार प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात यश आले आहे.

साधारण महिन्याभरापूर्वी ठाण्याच्या कशेळी भागात फायरिंग ची घटना घडून त्यात गणेश कोकाटे या माथाडी कामगार संघटनेशी संबधीत इसमाची हत्या झाली होती. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ माजली होती. मुख्यमंत्र्यांच्या शहरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेने पोलिसांवर दबाव निर्माण झाला होता. मात्र महिनाभर या हत्येचा उलगडा करण्यात अपयश आल्यानंतर अखेर ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ५ ने या गुन्ह्याची उकल करण्यात यश मिळाले असून आरोपी धनराज तोडणकर याला इंदिरानगर भागात सापळा रचून अटक केली आहे. या गुन्ह्यातील त्याचा साथीदार संदीपकुमार यालाही पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी धनराज हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून तो अनेक वर्षे फरार होता. २०१४ साली मयत गणेश कोकाटे याचे सोबत काही कारणांमुळे धनराज याचा वाद झाला होता. तेव्हा गणेश ने त्याचा अपमान करत मारहाण केली होती. याचाच राग धनराजच्या मनात कायम धगधगत होता. तो संधीची वाट बघत होता आणि अखेर त्याला संधी मिळताच ७ डिसेंबर रोजी कशेळी भागात गणेश कोकाटे याला गाठून त्याच्यावत गोळ्या झाडून त्याची हत्या केली.

गणेश कोकाटे यांच्यावर सप्टेंबर महिन्यात देखील पाठलाग करून गोळीबार झाला होता मात्र त्या घटनेदरम्यान गणेश कोकाटे हे बचावले होते त्या प्रकरणी गणेश कोकाटे यांनी ठाण्यातील चितळसर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल केला होता. सप्टेंबर महिन्यात गणेश कोकाटे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात अटक आरोपी धनराज तोडणकर आणि त्याचा साथीदार संदीप कनोजिया यांचा काही सहभाग होता का? आणि या प्रकरणात आणखी कोण सहभागी होत का? याचा तपास ठाणे गुन्हे शाखा घटक ५ पोलीस करत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त शिवराज पाटील यांनी दिली आहे.

याप्रकरणी धनराज रमाकांत तोडणकर आणि संदीप कनोजिया या दोन्ही आरोपींवर गुन्हे शाखा घटक ५ च्या पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. उद्या न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपींच्या शिक्षेची पुढील दिशा ठरणार आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment