विदर्भ

नागपुरातील ३०१ स्वातंत्र्यसैनिकांच्या घरी लागणार नामफलक

नागपुरातील ३०१ स्वातंत्र्यसैनिकांच्या घरी लागणार नामफलक

भारतीय स्वातंत्र्यलढ्याला गौरवशाली इतिहास आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांचे रक्त सांडले़ त्यात नागपूर शहरातील योद्ध्यांचेही योगदान मोठे आहे. या स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याचा सन्मान करतानाच त्यांच्या परिवाराचे आभार मानावे व या माध्यमातून आपण उपभोगत असलेल्या स्वातंत्र्यासाठी योगदान देणाºया स्वातंत्र्यसैनिकांची माहिती शहरातील नव्या पिढीला व्हावी, या उद्देशाने महापौर दयाशंकर तिवारी यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात अभिनव संकल्पना मांडली.

प्रजासत्ताकदिन, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५ वी जयंती हा तिहेरी योग साधत या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. महापौरांच्या संकल्पनेतून भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सर्वस्व अर्पण करणाऱ्या नागपूर शहरातील स्वातंत्र्य सैनिकांच्या घरापुढे नामफलक लावण्यात येत आहे. त्याची सुरुवात २६ जानेवारी रोजी नवाबपुरा येथील शहीद शंकरराव महाले यांच्या निवासस्थानापासून करण्यात आली.

यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, गांधीबाग झोनच्या सभापती श्रद्दा पाठक, उपायुक्त मिलिंद मेश्राम, नगरसेवक राजेश घोडपागे आणि महाले यांच्या परिवारातील मंडळी उपस्थित होती. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात प्राणाची आहुती देणाऱ्या योद्ध्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या घरापुढे मनपातर्फे नामफलक लावून त्यांच्या परिवाराचे आभार मानणारे संदेश त्यावर शहरातर्फे कृतज्ञता व्यक्त करण्याच्या महापौरांच्या या संकल्पनेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

नागपूर शहरातील ३०१ स्वातंत्र्यसैनिकांच्या घरापुढे असे नामफलक लावण्यात येणार आहेत. शहीद शंकरराव महाले यांनी १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात इंग्रज सरकारच्या विरोधात भाग घेतला होता. त्यांचे वडील दाजिबाजी महाले यांना या आंदोलनात गोळी लागली होती. त्या विरोधात नागरिकांनी नवाबपुराच्या पोलीस चौकीमध्ये आग लावली होती.

या आंदोलनाचे नेतृत्व शहीद शंकर महाले यांनी केले होते. त्याविरोधात इंग्रजांनी त्यांना अटक करून फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र, त्यावेळी शंकरराव केवळ १६ वर्षांचे होते. पुढे दोन वर्षे त्यांना कारागृहात ठेवून नंतर फाशी देण्यात आली. स्वातंत्र्य चळवळीतील आंदोलनात देशात सर्वांत कमी वयात शंकरराव महाले यांनी देशासाठी प्राण अर्पण केले.

फाशीची शिक्षा होण्यापूर्वी आईची भेट झाली, तेव्हा रडत असणाºया आईची शंकररावांनी समजून काढताना सांगितले होते की, ‘मी तुमच्या पोटी पुन्हा जन्म घेईऩ’ शंकरराव महाले यांच्या पुतळ्याचे अनावरण देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केले होते. यावेळी त्यांच्यासोबत इंदिरा गांधीसुद्धा होत्या, असे त्यांच्या परिवारातर्फे सांगण्यात आले. लाल किल्ल्यावरही शंकर महाले यांचे तैलचित्र लावण्यात आले आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment