विदर्भ

राष्ट्रीय महामार्गावर स्कूल बसचा अपघात

गडचिरोली- जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या सिरोंचा तालुक्यातील अंकीसा येथून आसरअलीकडे निघालेल्या स्कुल बसचा मंगळवारी सायंकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला.ही बस अंकीसा येथून जवळपास ६० ते ६५ विद्यार्थ्यांना कोंबून आसरअली कडे जात होती.या बस मधील अनेक विध्यार्थी गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार ए पी-१५ एक्स ९६१७ क्रमांकाची स्कुल बस अंकीसा येथील लक्ष्मीकांतय्या इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल येथून शाळा सुटल्यावर जवळपास ६० ते ६५ शालेय विद्यार्थ्यांना घेऊन आसरलीकडे जात होती.दरम्यान, रस्त्याच्या कडेला कोसळल्याने यातील अनेक विध्यार्थी गंभीर जखमी झाल्याची माहिती आसरअली येथील पालकांनी दिली आहे.

स्कूल बसचा अपघात झाल्याची माहिती कळताच आसरअली येथील पालकांनी लगेच धाव घेत आपापल्या पाल्यांना जवळपास असलेल्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे. सदर अंकीसा ते आसरअली हा राष्ट्रीय महामार्ग असून हा रस्ता थेट छत्तीसगड कडे जातो. स्कूल बस म्हणून वापरत असलेले वाहन हे आंध्र प्रदेशची पासिंग असून ही बस अक्षरशः भंगार स्थितीत असून सदर वाहनचालक नशा करून वाहन चालवत असल्याची काही पालकांनी दिली आहे.

या अपघातात नेमके किती विद्यार्थी जखमी झाले याची अधिकृत माहिती नसले तरी पालकांनी आपापल्या पाल्यांना उपचारार्थ दाखल केले आहे. विशेष म्हणजे खाजगी शाळेत चालविले जाणारे बस विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नेमका अपघात कशामुळे झाला हे अध्यापन करू शकले नाही. मात्र, पालकांकडून शालेय प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त केली जात आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment