पश्चिम महाराष्ट्र

पुण्यात चंद्रकांत पाटलांच्या कार्यलयसमोरच राष्ट्रवादीची घोषणाबाजी

पुणे – भाजप नेते उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शाळा सुरू करण्याकरता सरकारच्या अनुदानावर अवलंबून का राहता? ‘महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू करण्यासाठी भीक मागितली होती,’ असं वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावर आता राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन करत चंद्रकांत पाटलांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

महाराष्ट्राच्या ६३ वर्षांच्या इतिहासात सर्वात नालायक आणि वाचाळवीर मंत्री म्हणून नोंद होईल. चंद्रकांत पाटलांनी जे वक्तव्य केलं आहे, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीचा अपमान करणारे आहे. असं राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले आहेत. चंद्रकांत पाटलांच्या या विधानाच्याविरीधात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं चंद्रकांत पाटील यांच्या कार्यलयाजवळ जोरदार घोषणाबाजी केली.

चंद्रकांत पाटलांची तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी व्हावी, त्याच्यावर ऍट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल व्हावा आणि महाराष्ट्राच्या महापुरुषांचा सातत्याने अपमान करणाऱ्या भाजपने माफी मागावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. तर, या राज्याच्या अस्मिता असणाऱ्या महापुरुषांबद्दल याआधी अशाप्रकारचं घाणेरडं वक्तव्य केलं नव्हतं. यावरून भाजपच्या ओठात काय आणि पोटात काय हे लक्षात येतंय. आपली मनुस्मृती पुढे नेताना भाजपच्या मनात बहुजन नेत्यांच्या बाबतीत घृणा आहे यावरून सिद्ध होत असा घणाघात प्रशांत जगताप यांनी केला आहे.

दुसरीकडे आज भाजप आणि मनसे वगळता पुणे शहरातील सर्व प्रमुख पक्ष आणि संघटना एकाच पत्रकावर सह्या करून चंद्रकांत पाटलांवर ऍट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी पुण्याच्या पोलीस आयुक्तांकडे केल्याची माहिती जगताप यांनी दिली आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment