डोंबिवली – माजी खासदार आणि राष्ट्रवादी पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या विरोधात मानपाडा आणि रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केण्यात आली आहे. तर याबाबत आनंद परांजपे यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही.
राष्ट्रवादीचे माजी खासदार व ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी त्यांच्या ट्विटरवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचे विरोधात एक वादग्रस्त व्हिडियो वायरल केला आहे. त्याचे शीर्षक महाराष्ट्राच्या महानतेला व मुख्यमंत्री पदाला अपमानास्पद आहे. मुख्यमंत्री पदाचा अपमान केल्याबद्दल आनंद परांजपे यांच्या विरोधात मानहानी व राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना पदाधिकारी रामनगर व मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेत तक्रार दाखल करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
तर मानपाडा पोलीस ठाण्यात कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील व कार्यकर्त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांची भेट घेत परांजपे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे सांगितले की परांजपे यांच्याविरोधात अदखलपात्र (एनसी) गुन्हा दाखल केला आहे.