नाशिक – शहरातील राष्ट्रवादीच्या नेत्या तसेच डॉक्टर प्राची पवार यांच्यावर अज्ञात समाजकंटकांकडून हल्ला करण्यात आला आहे. या घटनेने नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे. प्राची पवार यांच्यावर हल्ला का झाला याबाबतचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्या डॉक्टर प्राची पवार यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांना नाशिकच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
प्राची पवार ह्या माझी आमदार व राष्ट्रवादीचे माजी दिग्गज नेते वसंत पवार यांची मुलगी आहे. प्राची पवार यांच्यावर हल्ला झाल्याने नाशिक शहरातील गुन्हेगारी चव्हाट्यावर आली आहे. प्राची पवार यांच्यावरील हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही त्यामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले जात असून चर्चांना उधान आले आहे. राष्ट्रवादीच्या महिला नेत्यावर हल्ला झाल्याने राष्ट्रवादीच्या गोटात देखील खळबळ उडाली आहे. डॉक्टर प्राची पवार यांच्यावर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयात त्यांच्या कार्यकर्त्यांसह नातेवाईकांनी गर्दी केली असून सरकारला पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे हे देखील दाखल झाले आहेत.