खान्देश

नवीन रक्त चाचणी..,मनगटावर बांधून ३० सेकंदात हृदयरोगाचे निदान

नागपूर – ह्दयविकाराचे निदान करण्यासाठी रक्ताचे नमुने तपासले जातात. तसेच अहवाल येण्यासाठी १ ते २ तासांचा गकालावधी लागतो. मात्र आता घडयाळ मनगटावर बांधून ३० सेकंदात हृदयरोगाचे निदान करणे शक्य झाले आहे. त्यामुळे भविष्यात रक्त नमुने तपासण्याची भविष्यात गरज भासणार नाही.

नागपुरातील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. शंतनू सेनगुप्ता यांच्या पुढाकाराने ही चाचणी करण्यासाठी २३८ रुग्णांवर या घड्याळाची यशस्वी चाचणी करण्यात आली. छातीत वेदना होण्याला संबंधिताच्या शरीरात ॲसिडीटी वाढणे, स्नायूदुखी, हृदयविकाराचा झटका हे कारण असू शकते. सध्याच्या प्रचलित पद्धतीत अशा रुग्णाचा प्रथम ‘ईसीजी’ काढला जातो. त्यात काही अनुचित आढळल्यास रक्त नमुने घेऊन त्यातील ‘ट्राॅपोनिन’चे प्रमाण तपासले जाते. रक्तात ‘ट्रापोनिन’चे प्रमाण जास्त आल्यास रुग्णाला हृदयविकाराचा झटका आल्याचे स्पष्ट होते.

२०२१ ते २०२३ दरम्यान डॉ. सेनगुप्ता, डॉ. महेश फुलवानी, डॉ. अजीज खान, डॉ. नितीन देशपांडे आणि रायपूरचे डॉ. स्मित श्रीवास्तव यांच्या पाच वेगवेगळ्या रुग्णालयात २३८ रुग्णांवर चाचणी झाली. रुग्णांच्या रक्तातील ‘ट्राॅपोनिन’ तपासले गेले. दोन्ही अहवालांची तुलना केली असता ९८ टक्के अहवाल सारखे व अचूक आल्याचे डॉ. सेनगुप्ता यांनी सांगितले.

मध्य भारतातील पाच केंद्रात ‘डिजिटल’ पद्धतीने हृदयरोगाचे निदान करण्याबाबत २३८ रुग्णांवर मानवी चाचणी करण्यात आली. ती यशस्वी ठरल्याने भविष्यात ‘डिजिटल’ घडयाळ मनगटावर बांधून ३० सेकंदात हृदयरोगाचे निदान करणे शक्य झाले आहे. हे संशोधन युरोपीयन हेल्थ जनरलमध्ये ६ मार्च २०२३ रोजी प्रसिद्धही झाले आहे.

रक्तात ‘ट्रापोनिन’चे प्रमाण जास्त आल्यास रुग्णाला हृदयविकाराचा झटका आल्याचे स्पष्ट होते.त्यामुळे हे यंत्र मनगटावर ३० सेकंद बांधल्यास त्यातील लेझरच्या मदतीने रक्तातील ‘ट्रॅापोनिन’ शोधणे शक्य होते, आणि याद्वारे ह्दयविकाराचे निदान करता येते. ३० सेकंदात निदान करणारे हे जगातील पहिले तंत्र असल्याचे डॉ. सेनगुप्ता यांनी सांगितले.

कसे होते निदान?

नवीन विकसित यंत्र मानवाच्या मनगटावर घडयाळासारखे बांधले जाते. ते सुरू करताच त्यातील लेझर रक्तातील ‘ट्रॅापोनिन’चे प्रमाण शोधतो. त्यानंतर हा ‘डाटा’ थेट ‘क्लाऊड’मध्ये जातो. दरम्यान, रुग्णाच्या रक्तात ‘ट्रॅापोनिन’चे प्रमाण वाढल्याचे पुढे आल्यावर त्याला हृदयविकार आल्याचे स्पष्ट होऊन डॉक्टर उपचार सुरू करू शकतात. रक्ताचे नमुने न घेता काही सेकंदात रक्तातील ‘ट्रॅापोनिन’ शोधण्याच्या तंत्राची यशस्वी चाचणी झाली. यासाठी आवश्यक यांत्रिक घडयाळ लवकरच बाजारात येऊ शकते. त्यामुळे भविष्यात इतरही चाचण्या ‘डिजिटल’ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment