कोल्हापूर – रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज या सामाजिक संस्थेला २०२१-२०२२ मध्ये २५ वर्ष पूर्ण झाले आहेत. संस्थेच्यावतीने १८ जानेवारीला स्वयंम शाळेस ई लर्निंग व सेन्सरी गार्डन उभारणी ,डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये नवजात शिशु अतिदक्षता विभाग व मणक्यावरील शस्त्रक्रिया मशीन प्रदान केले जाणार आहे अशी माहिती माजी अध्यक्ष सचिन मालू यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
१८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता रोटरी सनराईज यांच्या वतीने कसबा बावडा येथील इंडियन रेडक्रॉस सोसायटी कोल्हापूर शाखा संचलित स्वयंमशाळेमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पंधरा लाख रुपये खर्च करून ई लर्निंगची सुविधा शाळेतील आठ वर्गांकरिता उपलब्ध करून दिली जात आहे.ज्यात लॅपटॉप, टीव्ही, सॉफ्टवेअर अशा साहित्याचा समावेश आहे. ई लर्निंग व उद्यान उपक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या हस्ते होणार आहे.
याच दिवशी डॉक्टर डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर कदमवाडी येथे व्हेंटिलेटर, बेबी वॉर्मर, इनक्यूबेटर, फोटोथेरेपी अशा अत्याधुनिक मेडिकल साहित्यांचा समावेश असणारे “शिशुरक्षा” या नावाने नवजात शिशु विभाग याठिकाणी तयार करण्यात आला आहे. उद्घाटन सोहळ्यासाठी रोटरी सनराईजतर्फे माजी अध्यक्ष सचिन मालू व सचिव दिव्यराज वसा, विक्रांतसिंह कदम, प्रसन्न देशिंगकर, राहुल.आर. कुलकर्णी, सचिन झंवर,राजूभाई परीख,चंद्रकांत राठोड, इंद्रजीत दळवी, डॉ. सचिन पाटील यांचे याला मोलाचे मार्गदर्शन व योगदान लाभले आहे.
तउद्घाटन समारंभास सध्याचे अध्यक्ष ऋषिकेश खोत, व सचिव राहुल.एस. कुलकर्णी, यांच्या उपस्थितीत समारंभ पार पडणार आहे. या पायाभरणी व हस्तांतरण कार्यक्रमास रोटरी इंटरनॅशनल व रोटरी जिल्हा ३१७० तर्फे माजी प्रांतपाल गौरीश धोंड, विद्यमान प्रांतपाल व्यंकटेश देशपांडे व नासिर बोरसदवाला, शरद पै, अरुण भंडारे, माजी सहाय्यक प्रांतपाल करुणाकर नायक, विद्यमान सहाय्यक प्रांतपाल सुभाष कुत्ते, डिस्ट्रिक्ट ऑफिसर अजय मेनन आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.