पालघर – रिसॉर्ट मधील स्विमिंग पूलमध्ये बुडून एका नऊ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मामाचे गाव असे रिसॉर्टचे नाव असून रुद्र देविदास वाडकर(वय ९) असे स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झालेल्या नववर्षाच्या मुलाचे नाव आहे.
बोईसर- चिल्हार मार्गावर गुंदले गावच्या हद्दीत मामाचा गाव हे रिसॉर्ट रिसॉर्ट आहे. या रिसॉर्टमध्ये नाताळ सुट्ट्या व नववर्षाचे स्वागत करण्यासाठी वाडकर कुटुंबीय आले होते. सोमवारी सकाळच्या सुमारास रुद्र देविदास वाडकर हा नववर्षाचा मुलगा स्विमिंग पूलमध्ये बुडाला. त्यानंतर बेशुद्ध अवस्थेत त्याला नागझरी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत रुद्र देविदास वाडकर हा डहाणू तालुक्यातील कासा गावचा रहिवासी आहे.
रिसॉर्टमधील स्विमिंग पूलसाठी जीवरक्षक नसल्याने मुलाचा बुडून मृत्यू झाल्याचे कळते. पालघर जिल्ह्यात अनेक रिसॉर्ट असून या रिसॉर्टमध्ये स्विमिंग पूलमध्ये पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी जीवरक्षकांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. मात्र याकडे रिसॉर्ट मालकांचे दुर्लक्ष होत असल्याने अशा प्रकारच्या घटनांमध्ये पर्यटकांचे बळी जात आहेत.