पुणे/खेड – पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इयत्ता पाचवीमध्ये शिकणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतून वडिलांनी तुला खेडला बोलावले आहे, असे त्या मुलीला सांगून तिला हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खेड तालुक्यातील राक्षेवाडी परिसरात हा प्रकार घडला आहे.
कल्याण सोनबा राक्षे असे अत्याचार करण्यात आलेल्या नराधमाचे नाव असून त्याच्यावर खेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने तक्रार दखल केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, एका पस्तीस वर्षीय व्यक्तीने संबधित मुलगी शालेत असताना तिच्या शाळेत जाऊन तुला तुझ्या वडिलांनी खेड ला बोलावले आहे. मात्र त्याने त्या मुलीला खेड येथे न नेता एका हॉटेलवर नेत तिच्यावर अत्याचार केला आणि पुन्हा शाळेत आणून सोडले. या घटनेने पीडित मुलगी घाबरून गेली होती. घडलेला सर्व प्रकार तिने आईला सांगितला. मुलीच्या आईने क्षणाचाही विलंब न करता खेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून खेड पोलिसांनी संबधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
या घटनेमुळे शाळा प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शाळेत येऊन कोणीही काही करून जाते आणि शिक्षकांना याबाबत काही माहिती होत नाही. या प्रकारामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. यामुळे शाळेत मुलींची सुरक्षा देखील धोक्यात आल्याचे पहायला मिळत आहे. या प्रकारामुळे शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.