कोंकण

नितेश राणेंच्या तब्बेत बिघडली, उपचारासाठी कोल्हापूरला हलविण्याचा तयारी सुरू

सीपीआर रुग्णालयात समोर पोलिस बंदोबस्त तैनात

सिंधुदुर्ग – आमदार नितेश राणे यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविले जाणार आहे. कोल्हापूर मधल्या सीपीआर रुग्णालयात त्यांना दाखल केले जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात सीपीआर रुग्णालया समोर पोलीस बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे.

आमदार नितेश राणे यांचे काही कार्यकर्ते सीपीआर रुग्णालयात दाखल झाले आहेत. दरम्यान नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात आज तीन वाजता सुनावणी होणार आहे. राणे यांच्यासोबतच त्यांचे खासगी सचिव राकेश परब यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होईल.

काल नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर कणकवलीहून ओरोस जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. रक्तदाब वाढल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

यानंतर उपचार सुरू होते. दरम्यान जिल्हा रुग्णालयात कार्डियाक सिस्टीम उपलब्ध नसल्याने कोल्हापूर मध्ये नेऊन तपासणी केली जाणार आहे.

नारायण राणे यांच्या पडवे मेडिकल कॉलेजचे डीन डॉक्टर आर एस कुलकर्णी आणि डाॅक्टर मिलिंद कुलकर्णी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन श्रीपाद पाटील यांच्याशी महत्त्वाची चर्चा चालू आहे.

नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आजच होणार न्यायालयात सुनावणी

कणकवली दिवाणी न्यायालयाने आमदार नितेश राणे यांना शुक्रवारी 18 फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली म्हणून त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान कालच तातडीने नितेश राणे यांच्या वकिलांनी आमदार नितेश राणे आणि त्यांचे खासगी सचिव राकेश परब यांचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केला आहे.

या जामीन अर्जावर शनिवारी दुपारी तीन वाजता सुनावणी होणार आहे. न्यायालयाने जामीन अर्ज नाकारल्यास मोठा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांना अधिक वैद्यकीय तपासणीसाठी कोल्हापुरातील सीपीआ रुग्णालयात दाखल केले जाणार आहे.

कोल्हापुरातील कार्यकर्ते सकाळ पासून सीपीआर रुग्णालयात कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी धावपळ करत आहेत.

त्यांना वैद्यकिय तपासणीसाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दुपारनंतर आणण्यात येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांचे कोल्हापुरातील कार्यकर्ते सकाळी सीपीआर रुग्णालयात कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी धावपळ करत आहेत.

शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी संशयित भाजपचे आमदार नितेश राणे व त्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांची पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी संपल्याने त्यांन न्यायालयाने दि. 18 फेब्रुवारीपर्यत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. प्रकृतीचे कारण पुढे करुन राणे येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment