मुंबई

पनवेलसह उरण मधील ४३ शस्रपरवाना धारकांना नोटिसा

पनवेल – नवीन पनवेल आणि उरण मध्ये ग्रामपंचायतीच्या होणाऱ्या निवडणुकांच्या अनुषंगाने नवी मुंबई पोलीस आयुक्त हद्दीमधील होणाऱ्या निवडणुकांमुळे उरण, पनवेल मधील ४३ शस्रपरवाना धारकांना बंदूक, पिस्तुल पोलीस ठाण्यामध्ये जमा करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. उरण तालुक्यातील १७ आणि पनवेल तालुक्यातील २३ अशा सर्व ४० ग्रामपंचायतींच्या निवडणुका १८ डिसेंबर रोजी होणार आहेत. त्यानंतर मतमोजणीला सुरुवात ही २० डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे मतदान आणि मतमोजणी मध्ये कोणत्याही प्रकारचे व्यत्यय, आणि शांतता भंग होणार नाही, कायदा सुव्यवस्था राखण्याच्या अनुषंगाने खबरदारीची उपाययोजना बाळगण्यासाठी पनवेल आणि उरण तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या हद्दीतील होणाऱ्या निवडणूकांमुळे ४३ शस्रपरवाना धारकांना स्वतः जवळील असलेले बंदूक आणि पिस्तुल पोलीस ठाण्यात जमा करण्यासाठी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. त्यामध्ये पनवेल मधील ७ नवीन पनवेल मधील २३ आणि उरण मधील १३ अशा ४३ शस्त्रपरवाना धारकांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे.

नोटिसा बजावल्यानंतर अनेक शस्रपरवाना धारकांनी स्वतः जवळ असलेली शस्रे पोलीस ठाण्यात जमा केली आहेत. तर उर्वरित शस्र जमा करण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी सांगितली.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment