व्हिडिओ

थोडक्यात: धर्माच्या नावावर देशात द्वेष पसरवणाऱ्या भगव्या वस्त्रधारी गुंडांवर मा. मोदी गप्प का ?

उत्तराखंड हरिद्वारमध्ये 17 पासून 19 डिसेंबरपर्यंत धर्म संसदेचं (Dharma Sansad) आयोजन करण्यात आलं होतं. या धर्म संसदेत साधू-संतांनी हिंदुत्वासंदर्भात केलेल्या वादग्रस्त भाषणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या धर्म संसदेतील वक्त्यांनी कथितरित्या मुस्लिमांविरुद्ध हिंसाचाराचं समर्थन केलं आणि ‘हिंदू राष्ट्रा’साठी संघर्ष पुकारण्याचं आवाहन केल्याचं सांगण्यात येतंय. माजी लष्करप्रमुख, कार्यकर्ते आदींनी या वादग्रस्त भाषणाचा तीव्र निषेध करत कारवाईची मागणी केली आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते आणि आरटीआय कार्यकर्ते साकेत गोखले यांनी या प्रकरणी आयोजक आणि वक्त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तीन दिवसांच्या या धर्म संसदेचा समारोप सोमवारी करण्यात आला होता. धर्म संसदेचा समारोप होऊन तीन दिवस उलटून गेल्यानंतर गुरुवारी उत्तराखंड पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. दरम्यान, आतापर्यंत याप्रकरणी कोणावर कारवाई करण्यात आलेली नाही. उत्तराखंड पोलिसांनी याप्रकरणी केवळ एका आरोपीचे नाव दिले आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment