पश्चिम महाराष्ट्र

एक कोटी ६८ लाखांचे सोन्याची ३ बिस्किटे जप्त, दोघे जण ताब्यात

सांगली – कवलापूर येथून पोलिसांनी तब्बल एक कोटी ६८ लाखांचा सोन्याची ३ बिस्किटे जप्त केली आहेत. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. एक किलो ९९४ ग्रॅम म्हणजे १९९ तोळे इतके हे सोने आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने हे कारवाई केली आहे. मिरज तालुक्यातल्या कवलापूर या ठिकाणी दोन संशयित तरुण फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली, त्यानुसार पोलिसांनी कवलापूर मधून रोहित चव्हाण,वय २७,राहणार कुमठे, तालुका तासगाव आणि संतोष नाईक, वय २६, राहणार कवलापूर, तालुका मिरज,या दोघांना ताब्यात घेत त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एक किलो ९९४ ग्रॅम वजनाच्या तब्बल एक कोटी ६८ लाखांचा सोन्याची 3 बिस्किटे आढळून आली, याबाबत चौकशी केली असता त्यांनी पलूस तालुक्यातील बंबावडे येथील ज्वेलर्स मित्र विक्रम मंडले, सध्या राहणार जालना येथील व्यक्तीचे हे सोने असल्याचं सांगितलं, मात्र त्या व्यक्तीकडे चौकशी केली असता, सोन्याच्या मालकीची पुरावे मिळाले नाहीत, त्यामुळे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात सदर घटनेची नोंद केली आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment