धुळे – बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट आज थिएटरमध्ये रिलीज होत आहे. शाहरुख चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर येत आहे, अशा परिस्थितीत त्याच्या चित्रपटाला प्रचंड विरोध होत आहे.
संपूर्ण देशात आज पठाण चित्रपट प्रदर्शित होत असताना दुसरीकडे मात्र शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाला विरोध होत आहे. आज धुळे शहरात बजरंग दल आणि हिंदू संघटनांकडून जोरदार निदर्शने केली जात आहेत. बजरंग दलाने धुळे शहरातील जोती टाकी आणि ॲडलब सिनेमा बाहेर आंदोलन करण्यात आले आणि मल्टिप्लेक्स आणि थिएटरमध्ये पठाण चित्रपट चालू न देण्याची धमकी दिली.
बहुचर्चित असलेला पठाण चित्रपट आज धुळे शहरातील ॲडलब चित्रपटगृहात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पठाण चित्रपटाचा निषेध करीत या ठिकाणी पोस्टर पाडले यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडे कट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. मात्र चित्रपट काही काळाने सुरू झाल्याने चाहत्यांनी पठाण चित्रपट पाहण्यासाठी गर्दी केली असल्याचे पाहायला मिळाले.