नांदगांव पेठ – अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ येथील संघटना पाटील नामक युवतीने सर्पमित्राचे प्रशिक्षण घेऊन, त्याचा उपयोग दुर्मिळ जातीच्या व इतर सापांना जीवदान देण्याचे कार्य ती करत आहे.
पदवीचे शिक्षण घेत असताना, दुर्मिळ जातीचे साप लुप्त होत असून अनेक नागरिकांच्या गैरसमजामुळे त्यांना ठार मारल्या जात असतात. साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे शत्रू नाही, मात्र त्याबाबत असलेले अज्ञान विषारी व बिनविषारी सापांची नसलेली ओळख यास कारणीभूत ठरते. तर या सापांची नागरिकांनी ओळख करून द्यावी, तसेच सापांना ठार मारू नये, तर सर्पमित्रांना पाचारण करून वन विभागाच्या रेस्क्यू तुकडीच्या स्वाधीन करावे असे आवाहन यावेळी संघटना पाटील यांनी नागरिकांना केले आहे. सापांची कमी होणारी संख्या आणि त्यामुळे उद्भवणारे धोके त्यांनी यावेळी प्रामुख्याने सांगितले.