महाराष्ट्र

आमची भूमिका जाहीर नाही….नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सध्यातरी आमचं मौन

जळगाव – नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सध्यातरी आमचं मौन असून आमची भूमिका जाहीर झालेली नाही, असे मंत्री गिरीश महाजन म्हणाले, तसेच भाजपचे अध्यक्ष तसेच देवेंद्र फडणवीस याबाबतची भूमिका जाहीर कदाचित ते आज जाहीर करु शकतील, असेही मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. महाजन यांच्या वक्तव्यावरुन आज भाजपची नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नेमकी भूमिका स्पष्ट होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. सत्यजित तांबे यांना भाजपचा छुपा पाठींबा असल्याचा प्रश्न विचारला असता, अशी कुठलीही माहिती अथवा सुचना माझ्याकडे आलेल्या नसल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं आहे. मंत्री गिरीश महाजन हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत, यादरम्यान जामनेर येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

बाईट ऑन सी व्होटर सर्वे

सर्व्हे काय म्हणतो ..यापेक्षा निवडणुकांमध्ये याच उत्तर मिळेल

जनता ही भाजपच्या पाठीशी आहे, नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी आहे, त्यामुळे येणाऱ्या लोकसभेच्या निकालावरुन ते स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी सी व्होटरच्या सर्व्हे बोलतांना दिली आहे. राज्यात सुध्दा शिंदे सेना व भाजपच्या युतीतील सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस हे अतिशय वेगाने काम करत आहेत, गेल्या अडीच वर्षात जनेतेने काय काय भोगलं आहे, मुख्यमंत्र्यांनी कशा पध्दतीने कामे केली, त्यामुळे हा सर्व्हे काय म्हणतो आणि तो सर्व्हे काय म्हणतो, या पेक्षा येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्याला याच उत्तर मिळेल, असेही मंत्री गिरीश महाजन म्हणाले.

बाईट ऑन गोद्री कुंभ मेळावा

जामनेर तालुक्यातील गोद्री येथे सुरु असलेल्या बंजारा, लभाना, नायकडा गोरबंजारा समाजाच्या मेळाव्यात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येणार असल्याचीही माहिती यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

बाईट ऑन आमदार अनिल भाईदास पाटील

गोद्री येथे होत असलेल्या कुंभमेळाव्यात कोट्यवधींची उधळण केली जात असून मंत्री गिरीश महाजन हे सत्तेचा गैरवापर करत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी केला होता, या आरोपावरही मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर दिले आहे. गोद्री येथे रस्ते तसेच पूलाचे काम झाले आहे, हे कुणाच वैयक्तिक काम झालेले नाही, अनिल पाटील यांनी अशी प्रतिक्रिया का द्यावी हे समजत नाही, असे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे, अतिशय अल्प असा खर्च याठिकाणी शासनाचा आहे, याठिकाणी रस्ते तसेच इतर कामे आधीच मंजूर होती, ती आता दोन ते तीन वर्षानंतर होत आहे, मात्र यावरुन त्यांना एवढा पोटशूल कशासाठी आहे, त्यांनी विचार करुन आरोप करायला हवा होता, हे दुर्देवी आहे, त्यांनी कुठल्याही पध्दतीने याची चौकशी करावी असे म्हणत हे आरोप निराधार असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment