कल्याणातील ठाणकरपाडा परिसरात जैन चाळीत ५६ वर्षीय चंद्रकात वरक आपल्या बहिणीसह राहतात .चंद्रकात वरक हाउसकीपिंग मध्ये, सुरक्षा रक्षक म्हणून तर कधी कुरीअर बॉय म्हणून काम करतात ..यातून जेमतेम मिळणाऱ्या १० ते १५ हजार रुपये पगारावर उदर निर्वाह करतात. मात्र बुधवारी एक तारखेला त्याना आयकर विभागाकडून एक कोटी १४ लाख रुपयाची नोटीस मिळाली. कोट्यवधीची नोटीस पाहून त्याना धडकी भरली. त्यांनी आयकर कार्यालयात धाव घेत विचारणा केली असता आयकर अधिकार्यांनी त्यांना त्यांच्या पनकार्डवर व कागदपत्राचा वापर करून चीन मधून काही वस्तूची खरेदी करण्यात आल्याचे आणि त्यावरील कर भरणा केलेला नसल्याचे सांगितले तसेच या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा सल्ला दिल्याचे वरक यांनी सांगितले. हा सर्व प्रकार ऐकून वरक यांना धक्का बसला आहे .या प्रकरणी वरक यांनी पोलीस ठाण्यात तक्रार तर करणारच आहे मात्र मी सर्व सामान्य आहे.. मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करतो.. संबंधित विभागाने,सरकारने माझ्या याच्यातून सुटका करावी अशी मागणी केली आहे .