पश्चिम महाराष्ट्र

महाराष्ट्र केसरी स्पर्धेनंतर पैलवान सिकंदर थेट सांगलीच्या कुस्ती मैदानात

सांगली – महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये वादग्रस्त ठरलेल्या कुस्तीनंतर पैलवान सिकंदर शेख थेट सांगलीच्या मैदानामध्ये उतरला आणि प्रतिस्पर्धी पैलवानाला चितपट करत त्याने “विसापूर केसरी गदा”पटकावली आहे.”सिकंदर शेख”ची कुस्ती पाहण्यासाठी हजारो कुस्ती शौकीन तासगावच्या विसापूरच्या मैदानात जमले होते.

महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेमध्ये सगळ्यात लक्षवेधी आणि वादग्रस्त ठरली ते पैलवान सिकंदर शेख आणि महिंद्र गायकवाड यांची कुस्ती यामध्ये सिकंदर शेख हा चित्रपट झाला मात्र त्याने जिगुन महेंद्र गायकवाड याला मिळाले त्यावर नाराजी व्यक्त केले त्यामुळे पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे आपल्याला महाराष्ट्र केसरी गदा पटकावता आली नसल्याची भावना व्यक्त केली.त्यानंतर सोशल मीडियावर आणि सर्वत्रच पैलवान सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्या समर्थकांच्या मध्ये सोशल मीडियावर जोरदार आरोप प्रत्यारोप देखील झाले.

महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेनंतर सिकंदर शेख याच्या कुस्ती बाबतीत सर्वांचं लक्ष लागून राहिला होता आणि पैलवान सिकंदर शेख महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेनंतर थेट सांगलीच्या कुस्ती मैदानात उतरल्याचं पाहायला मिळाले, तासगाव तालुक्यातल्या विसापूर या ठिकाणी विसापूर येथे यल्लमा देवी यात्रेनिमित्त भारतातील नामवंत मल्लांच्या कुस्ती मैदानाचे आयोजन केले होते. महाराष्ट्रासह संपूर्ण देशातून मल्ल कुस्तीसाठी आल्यामुळे या मैदानाला विशेष महत्त्व होते.

एक नंबरसाठी या मैदानात पैलवान सिकंदर शेख आणि पंजाबचा पैलवान नवज्योत सिंग यांच्यामध्ये लढत झाली, यावेळी या कुस्तीकडे हजारो कुस्ती शौकिनांचा लक्ष लागून राहिला होता आणि अत्यंत चुरशीच्या अटीतटीच्या या लढतीमध्ये अवघ्या ५ मिनिटात पंजाबचा पैलवान नवजीत सिंगला सिकंदरने मोळी डावावर लोळवत कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. आणि विसापूर केसरी कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद पैलवान सिकंदर शेखने पटकावले. सिकंदर शेख हा पाच लाख रुपये आणि विसापूर केसरी गदा चा मानेकरी ठरला.

या कुस्ती मैदानामध्ये देशभरातच महाराष्ट्रातल्या अनेक मल्लांनी देखील सहभाग घेतला होता,त्यांच्यामध्ये ही अत्यंत चुरशीच्या लढती पार पडल्या,या मैदानावर लहान मोठया १५० ते २०० चटकदार कुस्त्या झाल्या.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment