न्यू दिल्ली – ऑल इंडिया फाईन आर्टस अँड क्राफ्टस सोसायटी (आयफेक्स) न्यू दिल्ली मार्फत आयोजित केलेल्या ९५ व्या वार्षिक कला प्रदर्शनासाठी एकूण ७३१ कलाकृती मधून चित्रकार नागेश हंकारे यांच्या “ब्युटी ऑफ नेचर” या चित्राची निवड झाली असून या चित्रास “मनोहर कौल मेमोरियल कॅश अवॉर्डनी” सन्मानीत करण्यात आले.
ऑल इंडिया फाईन आर्ट्स & क्राफ्ट्स सोसायटी (आयफेक्स) न्यू दिल्ली येथे प्रतिष्टीत मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. अवॉर्ड वितरण जगप्रसिद्ध चित्रकार प्रेम सिंग यांच्या हस्ते व जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. समारंभास चेअरमन प्रो. बिमल दास, विजय सूद यांच्यासह कलाक्षेत्रातील अनेक मान्यवर व कलारसिक उपस्थित होते.
निवडक कलाकृतींचे प्रदर्शन २१ डिसेंबर २०२२ पर्यंत सकाळी ११ ते ७ या वेळेत ऑल इंडिया फाईन आर्टस अँड क्राफ्टस सोसायटी (आयफेक्स) न्यू दिल्ली येथे विनामूल्य खुले आहे.