महाराष्ट्र मुंबई

पतीनेच केला पत्नीवर बलात्कार

नवी मुंबई – तील कळंबोली मध्ये एका ४३ वर्षीय महिलेने आपल्याच पती विरोधात मनाविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. २००६ पासून पती मंगेश बोऱ्हाडे हा पीडितेस मुलगी झाली म्हणून दारु पिऊन मारहाण करत होता तसेच राहते घर आपल्या नावावर करावे यासाठी देखील मारहाण करत असल्याने वारंवार होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून पीडित महिलेने आपल्या पती विरोधात तक्रार दाखल केली. कळंबोली पोलिसांनी तक्रारी वरून पती मंगेश बोऱ्हाडे विरोधात जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केल्या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. अलीकडच्या काळामध्ये स्रियांसोबत छळवणूकीचे प्रकार वारंवार घडत असलेले ऐकायला मिळतात. छळवणूक करणाऱ्या व्यक्तींविरोधात कारवाई करून त्यांना कठोर शिक्षा देखील केली जाते. तरीसुद्धा समाजामधील छळवणूकीचे प्रकार कमी होत नसल्याचे दिसून येतात.

कळंबोली येथे एका ४३ वर्षीय महिलेच्या बाबत देखील छळवणूक केल्याची घटना घडली आहे. ही महिला ४३ वर्षाची असून शारीरिक आणि मानसिक त्रासात कंटाळून पत्नीने आपल्याच पती विरोधात कळंबोली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असून आरोपी मंगेश बोऱ्हाडे ला अटक करण्यात आली आहे. तसेच सदर घटनेबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment