पश्चिम महाराष्ट्र

पट्ट्याने थेट कट्टा दाखवत भुर्जी आणि पैसे दोन्ही लुटले

पुणे – पोटाची खळगी भरण्यासाठी छोटे ,मोठे हॉटेल व्यावसायिक, हातगाडी चालक रात्री उशिरापर्यंत कष्ट करत असतात. मात्र दारूचा नशेत दमदाटी करून या व्यवसायिकांना त्रास देणाऱ्या भाई लोकांना सद्या पुण्यात कहर केला आहे. पुण्यातल्या स्वारगेट परिसरात रात्री उशिरा अंडा भुर्जीची गाडी बंद करून जात असताना, एका अज्ञात नशेत असलेल्या व्यक्तीने अंडा भुर्जीची ओडर दिली, मात्र त्याला नकार दिल्याने त्या अज्ञात व्यक्तीने थेट कंबरेला लावलेला गावठी कट्टा दाखवत अंडा भुर्जी ही खाली आणि धंदा झालेली २५०० रुपयची रोख रक्कम ही धमकून नहेली. या घटनेनंतर परिसरात भीतीच वातावरण पसरले आहे.

या प्रकरणी कुणाल प्रभाकर कंबळे (वय २७ रा, कालवा रस्ता स्वारगेट.) याने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्या नुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी कुणाल हा स्वारगेट बस स्थानकाच्या पदपथावर आपली दाजीने दिलेली अंडा भुर्जीची गाडी लावतो. बुधवारी रात्री उशिरा तो हातगाडी बंद करून तेथून निघून जात असताना आरोपी तेथे आला. त्याने अंडा भुर्जी तयार करून देण्यास सांगितले. मात्र, कुणाल याने त्याला नकार दिला. त्यामुळे आरोपीने त्याच्याजवळील पिस्तूल काढले आणि कुणाल याला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर शिवीगाळ करीत जबरदस्तीने अंडाभुर्जी हातगाडीतील गल्ल्यातील अडीच हजारांची रक्कम काढून घेत पसार झाला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली तसेच आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून, स्वारगेट पोलिस गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment