कोंकण महाराष्ट्र

कवयित्री सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण काव्यसंग्रहाचे ७ जानेवारी रोजी प्रकाशन

कणकवली – सिंधुदुर्गातील प्रसिद्ध कवयित्री सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहाचे प्रकाशन जेष्ठ साहित्यीक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनिस यांच्या हस्ते शनिवार ७ जानेवारी रोजी कणकवली कॉलेज च्या एच.पी.सी.एल. सभागृहात दुपारी साडेतीन वाजता होणार आहे. राजगृह प्रकाशन कोल्हापूर च्या वतीने राखायला हवी निजखूण हा काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे. मिळून साऱ्याजणी मासिकाच्या संपादिका गीताली वि.म. यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या काव्यसंग्रह प्रकाशन सोहळ्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जेष्ठ साहित्यिका तथा महाराष्ट्र शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाच्या माजी सदस्या उषा परब , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठचे मराठी मंडळाचे सदस्य प्रा. डॉ. संदीप सांगळे, महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सदस्य तथा ख्यातनाम कवी डॉ. विशाल इंगोले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

सरिता पवार या मागील 25 वर्षे काव्य साहित्य लेखन करत असून त्यांच्या अनेक कवितांना राज्य तसेच आंतरराज्य पारितोषिके प्राप्त झाली आहेत. चैत्रपालवी चा शोध घेतानाच सरिता पवार यांची कविता चैत्रकाहिलीही मांडते. केवळ स्त्रीवादी कविता न करता पवार यांचे काव्यलेखन माणूसपणाच्या खुणा शोधत व्यक्ती ते समष्टी प्रवास करते. काव्यसंग्रहाला प्रस्तावना लिहिताना जेष्ठ साहित्यीक श्रीपाल सबनीस यांनी सरिता पवार यांचा हा काव्यसंग्रह म्हणजे स्त्री मुक्तीसह एकूणच मानवकुक्तीचा कैवार पेरणारी सुंदर कलाकृती असल्याचे म्हटले आहे. काव्यसंग्रह प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन राजगृह प्रकाशन आणि अद्वैत फाउंडेशन परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment