अमरावती – येथील सायन्स कोर मैदानात सध्या युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवामुळे पदवीधर निवडणूक आचारसंहितेचा भंग झाला असल्याचा ठपका ठेवतो जिल्हा प्रशासनाच्या वतीने कठोर कारवाई करत संपूर्ण बॅनर काढण्यात आले आहे.
स्वाभिमान पार्टीच्या कृषी महोत्सव मधील आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांचे बॅनर पोलिसांच्या उपस्थितीत हटवणे केले आहे. कालपासून सायन्स कोर मैदानावर स्वाभिमान महोत्सव सुरू झालं आहे. आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप करत बॅनर काढण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि पोलीस अधिकारी सायन्सकोर मैदानावर दाखल झाले आहे.