कोंकण महाराष्ट्र

आमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर पोलिसांची नजर

ठाणे – नववर्ष स्वागत आणि नाताळच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आपली कंबर कसली आहे. यावेळी पोलिसांकडून बनावट दारू आणि आमली पदार्थांच्या खरेदी विक्रीवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. ठाणे गुन्हे शाखा ५ कडून अशाच प्रकारची कारवाई करून शुक्रवारी मध्यरात्री म्हणजेच शनिवारी पहाटे कारवाई करून मोठ्या प्रमाणात कोकीन आणि मोफेड्रीन ड्रॅगची विक्री करण्यासाठी आलेल्या तीन नायजेरीयन व्यक्तींना अटक केली आहे. यात त्यांच्या हस्तकांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सध्या नाताळ, ख्रिस्मस आणि नववर्ष स्वागतासाठी तरुणाई मौज मज्जा म्हणून विवध पार्ट्यांचे आयोजन करतात आणि त्यात दारू सह इतर आमली पदार्थांचे देखील सेवन केले जाते. मात्र या सगळ्या गोष्टींवर आळा बसावा यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासनाकडून कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना प्राप्त झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर कामगिरी करत असताना पोलिसांना गुप्त बातमीदाराच्या माध्यमातून काही इसम ठाण्यातील कोरम मॉल परिसरात कोकीन आणि ड्रग विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या प्रकरणी ३ नायजेरीयन व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. या तीनही नायजेरीयन व्यक्तींची झडती घेतली असता त्यांच्याकडून ६० ग्राम कोकिन आणि ७० ग्राम मोफेड्रीन ड्रग्ज आढळून आले आहे. या कारवाईनंतर पोलिसांनी ओबासी मँगो स्टॅलिन, प्रॉस्पोरट ओप्रो, संडे ब्रोटेन या तीन जणांच्या विरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

मुंबई सह नजीकच्या उपशहरांमध्ये सध्या या अमली पदार्थांचे जाळे पसरत चालले आहे. यावर आळा बसावा यासाठी कडक धोरण राबवण्यात आले आहे. सध्या घटक ५ ने या तीनही नायजेरीयन व्यक्तींकडून कोकिन, मोफेड्रीन ड्रग्ज, मोबाईल असा जवळपास २० लाखांहून अधिकचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच या प्रकरणात अशा प्रकारे इतर काही इसम खरेदी किंवा विक्री करत आहेत का? किंवा त्यांच्यावर कोणाचे वरदहस्त आहे का? या बाबत तपास सुरू असल्याचे ठाणे गुन्हे शाखा घटक ५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांनी सांगितले.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment