पश्चिम महाराष्ट्र

फटाका फॅक्टरी स्फोटातील मुख्य आरोपीस पोलीस कोठडी

सोलापूर – इंडियन फायरवर्क्स फॅक्टरी मध्ये झालेल्या स्फोटात चार महिला कामगारांचा मृत्यू झाला होता. फॅक्टरी मालक युसूफ मणियार आणि नाना पाटेकर यांवर पांगरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला होता. घटना घडल्यापासून ग्रामीण पोलिसांनी दोघांच्या अटकेसाठी चार पथके पाठवली होती. एपीआय नागनाथ खुणे यांच्या पथकाला मंगळवारी दुपारी माहिती मिळाली होती, इंडियन फायर वर्क्स फॅक्टरीचा मालक युसूफ मणियार हा शिराळे येथील एका ज्वारीच्या शेतात लपून बसला आहे. चार पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन युसूफ मणियार यास बेड्या ठोकल्या. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्याला वर्षी येथील न्यायालयात उभे केले असता ७ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपअधीक्षक जालिंदर नालकुल करत आहेत.

दोन दिवसांपासून फरार युसूफ आणि नाना
रविवारी १ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास शिराळे गावच्या शिवारात फटाके फॅक्टरीत मोठा स्फोट होऊन चार महिला कामगारांचा मृत्यू झाला होता. या भीषण दुर्घनेनंतर सोलापुर जिल्हा प्रशासन हादरले होते. पोलिसांनी ताबडतोब फॅक्टरी मालक पांगरी गावातील युसूफ मणियार व फॅक्टरी चालक नाना पाटेकर यांवर भा.द.वि.३०४ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. घटना घडल्यापासून दोन्ही संशयीत आरोपी फरार झाले होते. मंगळवारी दुपारच्या सुमारास युसूफ मणियार यास ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे यांनी दिली.

ज्वारीच्या शेतात लपला होता
युसूफ मणियार हा ,दोन दिवसांपासून ज्वारीच्या शेतात लपला होता. घटना घडल्यापासून पांगरी गावातील युसुफचे अख्खे कुटुंब फरार झाले आहे. तर उस्मानाबाद येथील नाना पाटेकर हा देखील कुटुंबा सोबत फरार झाला आहे. एका गुप्त बातमी दाराने पोलिसांनी माहिती दिली, युसूफ हा, शिराळे गावातील एका ज्वारीच्या शेतात आहे. पांगरी पोलिसांनी ताबडतोब सर्व शेताला चोहोबाजूंनी घेरून युसूफला ताब्यात घेतले आहे. नाना पाटेकरला देखील लवकरच ताब्यात घेतले जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment