पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूरात ४३० ग्रामपंचायतींसाठी आज सकाळपासून मतदानाला प्रारंभ

कोल्हापूर – जिल्ह्यातील ४३० ग्रामपंचायतींसाठी आज सकाळी साडे सात वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाल आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ४३० ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार असल्याने मतदान केंद्रांवर १४४ कलम लागू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आदेश जारी केला आहे. त्यामुळे मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरात राजकीय पक्षांचे बुथ लावणे, प्रचार साहित्य बाळगणे तसेच मोबाईलचा वापरास प्रतिबंध असेल.

कोल्हापूरात निवडणुकीसाठी २०१५ केंद्रे आहेत. दहा हजारांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना यापूर्वीच प्रशिक्षण देण्यात आले आहे. या मतदानासाठी प्रशासनाकडून पूर्णपणे तयारी करण्यात आली आहे. मतदान अधिकारी कर्मचाऱ्यांना गावोगावी साहित्यांसह शनिवारी रवाना करण्यात आले. तालुका पातळीवर या मतदान साहित्यांचे वाटप काल करण्यात आले. दरम्यान, मतमोजणी मंगळवारी होणार आहे. सकाळी साडेसात ते सायंकाळी पाच या कालावधीत मतदान होणार आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment