कोंकण महाराष्ट्र

आमदार योगेश कदमांच्या घातपाताची शक्यता

रत्नागिरी – जिल्ह्यातील शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांच्या कारला झालेला अपघात हा घातपात घडवण्याचा कट होता का असा संशय आता व्यक्त होऊ लागला आहे. आमदार योगेश कदम यांचे निकटवर्तीय व शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी सखोल चौकशीची करण्याची मागणी केली आहे. दरम्यान या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. आमदार योगेश कदम हे माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांचे सुपूत्र आहेत.

आमदार योगेश कदम आपले मतदारसंघातील कार्यक्रम आटपून मुंबईच्या दिशेने जात असताना शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास कशेडी घाटात हा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की,मागून आलेल्या टँकर ने आमदार योगेश कदम यांच्या कारला जोरदार धडक दिली. यामध्ये टँकर पलटी झाला असुन टँकर चालक फरार झाला आहे. त्यामुळे अनेकांना शंका असून हा अपघात म्हणजेच घातपात होता का? याची शंका आता व्यक्त होऊ लागली आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी आमदार योगेश कदम समर्थकांनी अपघाताची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. अपघात रायगड जिल्ह्यात कशेडी घाटात पोलादपूर तालुक्यातील चोळई गावच्या हद्दीत झाला आहे.

अपघातात आमदार योगेश कदम यांचे चालक दीपक कदम व सुरक्षेसाठी असलेले दोन पोलीस किरकोळ जखमी झाले आहेत. आमदार योगेश कदम सुखरूप आहेत. त्यांनी सीट बेल्ट लावल्यामुळे सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. काळजी करू नका आम्ही सर्व सुखरूप-आमदार  योगेश कदम यांची अपघातानंतर पहिली प्रतिक्रिया दरम्यान या अपघातानंतर आमदार योगेश कदम यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे मी सुखरूप आहे, काळजी करू नका असं आमदार योगेश कदम यांनी म्हटलं आहे. आई जगदंबेच्या कृपेने आम्ही सर्व सुखरूप असल्याचा संदेश त्यांनी व्हीडीओ शेअर करून दिला आहे. पूर्वनियोजित कार्यक्रम ठरल्यानुसार होतील अशी माहिती आमदार योगेश कदम यांनी दिली आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment