पश्चिम महाराष्ट्र

पुन्हा एकदा चक्रीवादळ, महाराष्ट्रातात पावसाची शक्यता

पुणे : बंगालच्या उपसागरामधील कमी दाबाच्या क्षेत्राचे बुधवारी संध्याकाळी उशिरा चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. या चक्रीवादळाला ‘मंदोस’ अस नाव देण्यात आले आहे. या चक्रीवादळाचा फटका प्रामुख्याने दक्षिणेकडील राज्यांना बसणार असल्याची शक्यता आहे.

दरम्यान, हे चक्रीवादळ ८ तारखेला तामिळनाडूच्या किनारपट्टीवर येण्याची शक्यता असल्याने या भागातील 13 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात देखील याचा प्रभाव पाहायला मिळू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण मध्ये ८ व ९ तारखेला तर मध्य महाराष्ट्रात ९ तारखेला हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्याचप्रमाणे बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहणार असून, तापमानातील वाढही कायम राहण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरामध्ये दक्षिण-पश्चिम भागामध्ये दोन दिवसांपासून कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते. त्याची तीव्रता सातत्याने वाढत गेल्याने त्याचे चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. बुधवारी रात्री हे चक्रीवादळ चेन्नई शहरापासून समुद्रामध्ये दक्षिण-पूर्व दिशेला सुमारे ७०० किलोमीटर अंतरावर होते. चक्रीवादळाचा संभाव्य मार्ग उत्तर-पश्चिम दिशेने आहे. आज सकाळी हे चक्रीवादळ आंध्र प्रदेश, तमिळनाडूच्या किनारपट्टीजवळ असणार आहे. या कालावधीत त्याची तीव्रता अधिक असेल.

या चक्रीवादळाचा परिणाम ११ डिसेंबरपर्यंत राहणार आहे. ९ डिसेंबरला दक्षिणेकडे अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या सर्वांचा परिणाम महाराष्ट्रावर होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील अनेक भागांत हलक्या पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रासह,मराठवाडा आणि विदर्भात काही भागांत याचा फटका बसणार आहे. दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात ९ ते ११ डिसेंबर दरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर मराठवाड्यात १० डिसेंबर आणि विदर्भातील काही भागात ११ डिसेंबरला हलक्या ते मध्यम स्वरूपाची पाऊसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment