पश्चिम महाराष्ट्र

प्रमोद मनोहर कोपर्डे प्रतिष्ठान, साताराचे २०२२ चे पुरस्कार जाहीर

सातारा – सातारा येथील प्रमोद मनोहर कोपर्डे प्रतिष्ठानच्या वतीने यावर्षीचे साहित्य, कला, संस्कृती व समाज परिवर्तनासाठी देण्यात येणारे पुरस्कार जाहीर झाले आहेत. या पुरस्कारांमध्ये सहा मान्यवरांचा समावेश आहे. गेली पंचवीस तीस वर्षे सातत्याने जे आपल्या क्षेत्रात निष्ठेने काम करत आहेत त्यांना प्रतिष्ठानच्या वतीने एक वर्षाआड हे पुरस्कार दिले जातात. अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी आणि लेखक प्रमोद मनोहर कोपर्डे यांनी दिली. पंधरा हजार रुपयांचे चार व पाच हजार रुपयांचे दोन असे एकूण सहा पुरस्कार यात आहेत. त्याचे हे चवथे वर्ष आहे. या आधी तीन वर्षे पंचवीस हजार रुपयांचे दोन जीवन गौरव पुरस्कार देण्यात आले आहेत. त्यासह पुरस्काराचे हे सातवे वर्ष आहे.

यावर्षीचे जाहीर करण्यात आलेले पुरस्कार पुढील प्रमाणे
पंधरा हजाराचा धनादेश, मानचिन्ह, शाल,सातारा कंदी पेढे या स्वरूपाच्या पुरस्काराचे मानकरी -प्रसिद्ध कवी,समीक्षक योगिनी सातारकर- पांडे,नांदेड .( कमल मनोहर कोपर्डे स्मृती साहित्य पुरस्कार ), प्रसिद्ध चित्रकार प्राचार्य विजयकुमार धुमाळ,सातारा. ( प्रा. मनोहर कोपर्डे स्मृती कला पुरस्कार ), प्रसिद्ध कवी, चित्रकार,अनुवादक,संपादक मंगेश नारायणराव काळे ,पुणे .( डॉ. चंद्रशेखर जहागीरदार स्मृती संस्कृती पुरस्कार ), प्रसिद्ध डाॅक्युमेंटरी निर्माता,लेखक, दिग्दर्शक आणि सामाजिक कार्यकर्त्या माया खोडवे, नाशिक.( हुतात्मा विलास ढाणे स्मृती समाज परिवर्तन पुरस्कार ).नवोदितांसाठी पाच हजारांचा धनादेश, मानचिन्ह,शाल,सातारा कंदी पेढे या स्वरुपाचे पुरस्कार यावेळी महाराष्ट्र–कर्नाटक सीमाभागातील कवी, गीतकार पूजा भडांगे,बेळगाव. ( राधाबाई किसन कोपर्डे स्मृती साहित्य पुरस्कार ), नाटककार,डाॅक्युमेंटरी फिल्म निर्माता,लेखक,दिग्दर्शक अनुप जत्राटकर,निपाणी. ( पारुबाई भानुदास परदेशी स्मृती कला पुरस्कार )

या पुरस्कारांचे वितरण प्रमुख पाहुणे दिनकर झिंब्रे ,ज्येष्ठ पत्रकार आणि अध्यक्ष,संबोधी प्रतिष्ठान, सातारा यांच्या हस्ते सोमवार दिनांक ३० जानेवारी २०२३ रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता पाठक हाॅल,नगर वाचनालय, सातारा इथे आयोजित केलेल्या समारंभात होईल.तरी रसिकांनी या समारंभासाठी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांमार्फत करण्यात आले आहे .

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment