मुंबई

प्रियकरचा नादच खुळा, प्रेयसीच्या नादाने चोरल्या तब्बल १३ दुचाकी

डोंबिवली – गेल्या तीन वर्षांपासून लहान-मोठ्या चोऱ्या करणारा हा चोरटा रस्त्याच्या कडेला, इमारतींच्या आवारात पार्क केलेल्या दुचाक्या चोरण्यात पारंगत झाला. याच दरम्यान तो एका तरुणीच्या प्रेमात पडला. या तरुणीवर पैसा उधळण्यासाठी त्याने चोऱ्यांचा सपाटा लावला. चोरलेल्या दुचाक्या मिळेल त्या किंमतीत विकून आलेला पैसा प्रेयसीवर उधळू लागला. मात्र क्राईम ब्रँचचे कॉन्स्टेबल गुरूनाथ जरग यांची तीक्ष्ण नजर या चोरट्यावर पडली आणि चोऱ्यामाऱ्या करून अय्याशी जीवन जगणाऱ्या या चोरट्याला आता पोलीस कोठडी नंतर जेलची हवा खावी लागणार आहे. सदर आरोपीचे नाव शुभम पवार असून तो फक्त १९ वर्षाचा आहे.

कल्याण डोंबिवली शहरात दुचाकी चोरीच्या घटना या सातत्याने होत आहेत, त्याअनुषंगाने दाखल झालेल्या तक्रारीवरून कल्याण गुन्हे शाखा घटक – ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ यांच्या मार्गदशनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मोहन कळमकर यांच्या पथकाने सदर ठिकाणा वरील सीसीटीव्ही फुटेज तपासत आरोपीचा शोध सुरू केला. यातील आरोपी डोंबिवली मधील कोळेगाव मानपाडा याठिकाणी येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिस अंमलदार गुरुनाथ जरग,पोलीस हवालदार अनुप कामत,विनोद चन्ने,यांनी सदर ठिकाणी सापळा रचत शुभम पवार या १९ वर्षीय आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी मागील दोन वर्षात १३ दुचाकी चोरल्या असल्याचे कबूल केले. पोलिसांनी १६ लाख ५ हजार किंमतीच्या १३ दुचाकी विविध शहरातून हस्तगत केल्या असून विविध पोलीस ठाण्यातील १३ गुन्हे उघडकीस आणले आहे. तसेच आरोपी शुभम पवार हा प्रेयसीवर पैसे खर्च करण्यासाठी महागातील गाड्या चोरून विकत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

या चोरट्याने कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ५, कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून १ , डोंबिवलीच्या रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून २, विष्णूनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून २ आणि भिवंडीतील कोनगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ३ दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाल्या आहेत.क्राईम ब्रँचच्या या कारवाईमुळे अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची चिन्हे आहेत.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment