व्हिडिओ

महाराष्ट्र कन्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन

महाराष्ट्र कन्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या जीवनावरील आशिष सोशे लिखित मराठी ग्रंथाच्या एकूण 24 भाषा आणि बोलीतील भाषांतरित पुस्तके, दोन लिपीतील लेखन आणि नाट्यरूपांतर अशा एकूण 28 पुस्तकांचे एकत्रित भव्य दिव्य असा प्रकाशन सोहळा ठाणे येथील बेडेकर महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला.


ग्रंथ हा मोडी लिपी, ब्रेल लिपी ,ऑडिओ रूपांतर, नाट्यरूपांतर जर्मन, इंग्रजी, हिंदी, गुजराती, संस्कृत ,कन्नड , उर्दू, तामिळ, संथाली, कोंकणी , अहिराणी, झाडी , मारवाडी , वऱ्हाडी , मालवणी, हलबी, तडवी , लेवागणबोली, बंजारा, पारधी, भिलोरी, कैकाडी, मावची, भोजपुरी , तमिळ, इत्यादी बोली भाषेतून भाषांतरित करण्यात आला आहे .


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.राजन वेळूकर होते.
प्रमुख अतिथी म्हणून नाशिक विभागाचे माजी महसूल आयुक्त व प्रतिभाताई यांचे माजी सचिव रवींद्र जाधव,विख्यात लेखिका डॉ.प्रतिमा इंगोले उपस्थित होते,व्यासपीठावर पाणिनी प्रकाशनच्या संगीता चव्हाण,लेखक आतिष सोसे यांचीही उपस्थिती होती.कार्यक्रमाला ” कुटुंब रंगलंय काव्यात ” चे कलावंत विसूभाऊ बापट,निवेदक व कलावंत तुषार वाघुळदे, दूरदर्शनच्या माजी निवेदिका वासंती वर्तक,लेखिका माधुरी घारपुरे ,मेधा सोमण आदींची विशेष हजेरी होती.


याप्रसंगी अनुवादक लेखक आणि भाषा तज्ज्ञ यांचाही जाहीर सत्कार करण्यात आला.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment