पश्चिम महाराष्ट्र

पुणे हादरल, चुलत्यानेच आपल्या दोन पुतनिवर लैगिंक अत्याचार केले

पुणे – पुण्यात नक्की चाललंय तरी काय, एकीकडे खडक पोलीस स्टेशनच्या हाद्दीत आपल्या शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना ताजी असताना, काका पुतीनीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. आई-वडील आपल्या दोन मुलींना चुलत्याच्या घरी सोडून दिल्लीला गेल्यानंतर दोन्ही मुलींवर चुलत्याने व एका मुलीवर त्याच्या मित्राने बलात्कार केल्याचा धक्कादायक घटना घडली आहे.

हा प्रकार एका समाजसेविकेच्या निदर्शनात आल्यानंतर आरोपींविरोधात खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चुलता आणि त्याच्या मित्रास अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ही पीडित मुलींच्या ओळखीची असून १४ आणि १० वर्षांच्या दोन मुलींना तिचे आई-वडील आपल्या २९ वर्षांच्या चुलत्याजवळ सोडून दिल्ली येथे कामानिमित्त गेले होते. याचाच गैरफायदा घेत आरोपी चुलत्याने स्वतः लैंगिक अत्याचार केला. आणि त्याच्या मित्रालाही अत्याचार करण्यास सांगितले. हा प्रकार २० दिवसांपूर्वी घडला.

मुलींचे आई-वडील दिल्लीवरून अद्याप परतलेले नाहीत. त्यामुळे पुन्हा गैरकृत्याची शक्यता नाकारता येत नसल्याने मुलींनी फिर्यादी महिलेला चुलत्याच्या व त्याच्या मित्राच्या गैरकृत्याबद्दल सांगितले. त्यानंतर महिलेने खडक पोलिस ठाण्यात धाव घेत दोन्ही आरोपींविरोधात फिर्याद दिल्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली आहे. हा प्रकार समजल्यानंतर फिर्यादी यांनी दिल्ली येथे गेलेल्या पीडित मुलींच्या आई-वडिलांना या गैरकृत्याबद्दल सांगितले. त्यानंतर त्यांनी तत्काळ दिल्ली सोडून पुणे गाठले आहे. अधिक नितीनकुमार नाईक तपास करीत आहेत.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment