पुणे – पुणे – सोलापूर महामार्गावर अपघातांची संख्या वाढू लागली आहे. दर दोन दिवसाला अपघात होत आहे. अशीच एक घटना लोणी काळभोर हद्दीतून समोर आली आहे. सोलापूरच्या दिशेने निघालेली बोलेरो जीप गाडी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने डीव्हायाडरवरून थेट हवेत उडून दुसऱ्या बाजूने येणाऱ्या चारचाकीवर आदळली. या अपघातात तिघे जण गंभीर जखमी झाले असून गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोलापूरच्या दिशेने बोलेरो या चारचाकी गाडीतून दोघेजन निघाले होते. याचवेळी लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील राजेंद्र पेट्रोल पंपाशेजारी काही अंतर गेल्यावर गाडी वेगात असल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी डिव्हायडर वरून उडाली आणि दुसऱ्या बाजूने येत पुण्याकडे चाललेल्या चार चाकीवर जाऊन आदळली.
दडिव्हायडरला गाडी धडकल्याने गाडीने तीन पलटी मारत पुण्याच्या बाजूकडे जाणाऱ्या एका चारचाकी गाडीवर जाऊन आपटली. यामध्ये या चारचाकी चालकाच्या डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाली आहे. कार उलटल्यानंतर कारमधील चालकाला तात्काळ रुगणालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच बोलेरो गाडीतील दोघांनाही स्थानिकांच्या मदतीने लोणी काळभोर येथील रुगणालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचा व्हिडिओ समोर आला असून अंगावर शहरे अंनानारा हा अपघात आहे. या अपघातानंतर बघणाऱ्यांची एकच गर्दी झाली होती. काही वेळ याठिकाणी वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.