पुणे – मुंबई येथून निपाणी येथे एका कारमधून गांजा घेऊन जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. पुणे – सातारा रस्त्यावरील खेड शिवापूर टोल नाक्यावर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. राजगड पोलिसांनी ही कारवाई केली असून ९० हजार रुपयांचा आठ किलो गांजाचा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसानी काही चार जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात अजून मोठा असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे.
इस्माईल बाबू सय्यद (वय ३७), सैफ अली शब्बीर सुतार (वय २३), जैनुल गजभार मुल्ला (वय २१), जीआउल रहमान रियाज मुजावर (वय २०, सर्व रा. बेळगाव, कर्नाटक), आजू अजगर अली खान (वय २१, रा. मानखुर्द, मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलीसानी दिलेली माहिती अशी की, राजगड पोलीस दलाचे अधिकारी आणि कर्मचारी खेड शिवापूर टोलनाक्यावर नाकाबंदी करत होते. त्यावेळी पोलिस कर्मचारी सचिन कदम यांना माहिती मिळाली होती की, खेड शिवापूर टोल नाक्यावरून एका कारमध्ये गांजा घेऊन काही व्यक्ती जाणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी खेड शिवापूर टोल नाक्यावर सापळा रचला आणि मुंबई हून निपाणी कदे घेऊन जाणाऱ्या कार आणि चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अचानक झालेल्या कारवाईने काही वेळ वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. राजगड पोलिसांनी सतर्कता दाखवत ही कारवाई केल्याने गांजाचा मोठा साठा जप्त करण्यात आला.