पश्चिम महाराष्ट्र

पुण्यातील सराईत गुन्हेगाराला थरारक पद्धतीने संपवले

पिंपरी – पिंपरी चिंचवड हे गुन्हेगारीचे केंद्र बनत असल्याचे पहायला मिळत आहे. अशाच एक प्रकार समोर आला आहे. पिंपरी परिसरातील रामनगर चौकात उभ्या असलेल्या सराईत गुन्हेगाराची गोळीबार आणि त्यानंतर त्याच्यावर सपासप वार करून खून केल्याची घटना समोर आली आहे. या हल्यात हा सराईत जागेवरच ठार झाला आहे. जुन्या वादातून हा प्रकार घडला असल्याची माहिती समोर येत आहे. विशाल गायकवाड ( वय २९) असे सराईत गुन्हेगाराचे नाव असून पाळत ठेवून हा प्रकार केला असल्याचा.प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवारी संध्याकाळी सराईत गुन्हेगार विशाल गायकवाड हा रामनगर येथील चौकात उभा होता. काही वेळ तो तिथेच असल्याचे समजताच अज्ञात आठ ते नऊ व्यक्तीच्या टोळक्याने तिथे आले. त्यातील एकाने विशालवर गोळीबार केला.त्यातून तो बचावल्यानंतर त्यांनी विशालवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हल्लेखोर घटना स्थळावरून पसार झाले. त्याला काही व्यक्तींनी रुग्णालयात दाखल केले. पण त्यातच त्याचा मृत्यू झाला. विशालवर ज्यावेळी गोळीबार झाला त्यावेळी त्याला तीन गोळ्या लागल्याची माहिती देखील समोर आली आहे.

विशाल गायकवाड हा पिंपरी चिंचवड मधील सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर खून, मारमारी, लूटमार, दरोडा यांसारखे विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल होते. तसेच त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. तसेच तो पिंपरी परिसरात एक वॉशिंग सेंटर चालवण्याचे देखील काम करत होता. तो गुन्हेगार असल्याने अनेकांच्या डोळ्यावर तो असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या हत्येला मोशी येथे २५ ऑक्टोबर रोजी झालेल्या गुहेगार पवन लष्करे याच्या हत्येची किनार असून त्याच्या हत्येचा संशय असल्याच्या कारणावरून विशाल याची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. या घटनेत अद्याप कुणाला अटक करण्यात आली नसून पुढील तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

मात्र विशाल गायकवाडच्या हत्येने पिंपरी चिंचवड येथील गुन्हेगारी पुन्हा डोकेवर काढते की काय अशी शक्यता व्यक्त केली जाऊ लागली आहे. पिंपरी चिंचवड शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी डोके वर काढू लागली आसुन असे खुनाचे प्रकार दररोज समोर येत आहेत. त्यामुळे या गुन्हेगारीला रोखणे आता पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment