सांगली प्रतिनिधी.
कोल्हापूर पुणे रेल्वे दुहेरीकरणाचे काम गेल्या 2 वर्षा पासून मिरज तालुक्यातील नांद्रे परिसरात संथ गतीने सुरू आहे. येरळा नदीवरील पूल, ग्रेट नं. 122 ,गेट नं. 121 खालील ( मोरू) वरील कामाच्या खुदाईमुळे या दोन्ही मोरी बंद असल्याने मातीचा भराव पडून परिसरातील शेतात पाणी साचून राहिल्याने पिक कुजू लागली आहेत. वाहतूकीस रस्ता बंद करण्यात आल्याने शेतकर्यांना वाईवरून सातारा असा प्रवास करत शेती पीकवावी लागत आहे.

ग्रेट नं. 121 वरील नांद्रे खोतवाडी हा मुख्य रस्ता रेल्वे प्रशासनाने कोणतीही सूचना शेतकरी, ग्रामस्थांना न देता कायमस्वरूपी बंद केला आसून, पर्यायी रस्ताच नसल्याने या परिसरातील शेतकरी गेली दोन वर्ष मरणयातना भोगत आहे.
पावसाचे पाणी, शेतीतील निचरा होणारे पाणी जाण्याचा मार्ग बंद झाल्याने अतिरिक्त पाण्यामुळे शेतातील पाणी निचरा होण्यास मार्ग नसल्याने शेती क्षारपडीच्या मार्गावर आहे. रेल्वे प्रशासनाच्या नियोजन अभावामुळे येथील शेती संकटात सापडून येथील शेतकरी मोडकळीला आला आहे. येथील शेतीत क्षाराचे प्रमाण वाढून उत्पादनात प्रचंड घट होत आहे. रेल्वे दुहेरीकरणमुळे रेल्वे रूळ व मोरीत भराव करताना नैसगिक पाण्यासाठि असणार्या नाल्याच्या ओघळ वाटा, मोरी रेल्वे प्रशासनाने मुजवल्या आहेत.
शेतात पाणी साचणे, रस्ता बंद होणे, पाणी पुरवठ्याचे पाणी पुरवठा करणारी पाईप काढल्याने येथील शेतकरी नैसर्गिक व मानवनिर्मित संकटात सापडला आहे. शेतात क्षाराचे प्रमाण वाढत असल्याने जमिनीचा पोत घसरत चालला आहे.

नवीन रेल्वे दुहेरीकरण करताना शेतातील पाणी निचरा, रस्ते, शेतीचा पाणी पुरवठा, वाहतूक आदी बाबीचा योग्य खुलासा होणे आवश्यक आहे. त्याबाबत रेल्वे प्रशासन खुलासा करत नसून, लोकप्रतिनिधीनी ही बाब गांभीर्याने न घेतल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. ग्रेट नं. 122 जवळील मोरीच्या कामानिमित्त शेतीला पाणी पुरवठा करणाऱ्या सहकार संस्थेची पाईप लाईन निघणार असल्याने ऐन उन्हाळ्यात शेतातील हातातोंडाला अालेले पीक कसे जगवायचे हा महत्वा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

पालकमंत्री जयंत पाटील, कृषीराज्य मंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जि. प. सदस्य विशाल चौगुले, व स्थानिक लोकप्रतिनिधीनी या बाबत पुढाकार घेत येथील शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी शेतकरी करत आहेत.