अमरावती – झुकुझुकु चालणारी रेल्वे गाडी आणि आपल्या भावनांचा संबंध तो बालपणीपासून चा सध्याच्या धकाधकीच्या जीवनात रेल्वेत निवांत बसून वेळ घालवता यावा यासाठी केंद्र सरकारच्या संकल्पनेतून अमरावती येथे रेल्वेच्या टाकाऊ डब्यापासून हायटेक रेस्टॉरंट तयार करण्यात आले आहे. हे रेस्टॉरंट सध्या नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले आहे.
भारतीय रेल्वेच्या वतीने वेगन कारखान्यात पडून असलेल्या व निकामी झालेल्या रेल्वे डब्याचा सुयोग्य उपयोग करत अमरावती येथील बस स्थानकात त्याला स्थापित करण्यात आले. या डब्याला उत्तम अशी रंगरंगोटी करून रेल्वेचे रूप देत त्यामध्ये हायटेक रेस्टॉरंट तयार करण्यात आले. २४ तास उघडे राहणार हे एकमेव रेस्टॉरंट आहे यामध्ये रेल्वेचा फील आणि बालपणीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आबलवृद्ध या ठिकाणी रमत असल्याचे दिसून येत आहे. या रेस्टॉरंटची विशेषता म्हणजे यामध्ये बसून जेवण करत असताना आपण रेल्वेत असल्याचा आनंद मिळतो आणि या ठिकाणी ग्राहकाची ऑर्डर घेण्यासाठी येणारे ही टीसी च्या वेशात येतात म्हणजे एकूण रेल्वेची शिस्तीत हे रेस्टॉरंट चालत असल्याचे दिसून येतो.