बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव याच्याशी संबंधित एक बातमी समोर आली आहे. राजपाल सध्या उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे आगामी सिनेमाची शूटिंग करत आहे. यादरम्यान त्याच्यासोबत एक घटना घडली, ज्यामुळे तो चर्चेत आहे. एका मुलाने राजपालवर हाणामारी आणि गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. खरं तर, राजपाल प्रयागराजच्या कटरा भागात एका हिंदी सिनेमाची शूटिंग करत होता. यादरम्यान तो स्कूटर चालवत होता. यावेळी स्कूटर खराब झाल्यामुळे त्याने बालाजी नावाच्या एका विद्यार्थ्याला धडक दिली आणि त्याला दुखापतही झाली. या धडकेत विद्यार्थी कथितरीत्या जखमी झाला आहे. या घटनेनंतर विद्यार्थ्याने कर्नलगंज पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
असा आरोप आहे की, त्या विद्यार्थ्याने आक्षेप घेतल्यानंतर राजपाल यादव याच्या बाऊंसरने त्याला मारहाण केली. यानंतर विद्यार्थ्याने कर्नलगंज पोलीस ठाण्यात राजपाल आणि त्याच्या क्रू मेंबर्सविरोधात लिखित तक्रार दाखल केली. दुसरीकडे, राजपालनेही विद्यार्थ्यासह अनेकांवर शूटिंग रोखण्याचा आरोप लावला आहे. सिनेमाच्या प्रोडक्शन मॅनेजरनेही गुन्हा दाखल करण्यासाठी कथित पीडित विद्यार्थ्याविरुद्ध तक्रार नोंदवली आहे.
राजपाल विरोधात तक्रार दाखल