विदर्भ

रंभापुर गट ग्रा.पं. सरपंच किरण इंगळे यांचा वंचीतमध्ये पक्ष प्रवेश

मुर्तिजापूर – मुर्तिजापूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या रंभापुर गट ग्राम पंचायतीची निवडणूक नुकतीच पार पडली . या निवडणुकीत किरण इंगळे यांना ग्रामस्थांनी निर्विवाद विजयी केले . मागील पाच वर्ष गावात केलेल्या विकासकामांची पावती त्यांना मिळाली. म्हणूनच मतदारांनी त्यांना विजयी केले . भविष्यात गावातील अडगळीत पडलेली कामे पूर्णत्वास नेण्यासाठी नवनिर्वाचित सरपंच किरण इंगळे यांचा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे , महासचिव मिलिंद इंगळे यांच्या नेतृत्वाखाली व माना जिल्हा परिषद सर्कलच्या महीला व बालकल्याण सभापती रिजवाना परवीन शेख मुख्तार , सभापती माया नाईक , तालुका अध्यक्ष सुनील सरदार , माजी तालुकाध्यक्ष संजय नाईक, शेख मुख्तार , माजी सरपंच प्रशांत इंगळे यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीच्या कक्षात पक्षप्रवेश झाला .

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment